‘या’ बँकेत १० आठवड्यांची इंटर्नशिप, अन् पगार ७ लाखांहून अधिक; असा करा अर्ज

On: September 9, 2025 1:14 PM
World Bank Internship Offers
---Advertisement---

World Bank Internship Offers | वित्त, अर्थशास्त्र आणि व्यवसाय (Finance, Economics, Business) या क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक बँकेने (World Bank) एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. ‘वर्ल्ड बँक ट्रेझरी समर इंटर्नशिप २०२६’ (World Bank Treasury Summer Internship 2026) या कार्यक्रमांतर्गत, विद्यार्थ्यांना केवळ आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेत कामाचा अनुभवच नाही, तर ७ ते ८.५ लाख रुपयांपर्यंत विद्यावेतन (Stipend) देखील मिळणार आहे.

एकूण कमाई ७ लाख रुपयांपेक्षा जास्त होईल :

ही पेड इंटर्नशिप अमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी. (Washington D.C.) येथे १० आठवड्यांसाठी (२६ मे ते ३ ऑगस्ट २०२६) आयोजित केली जाईल. या काळात इंटर्न्सना एकूण ४०० तास काम करावे लागेल. अमेरिकन नागरिक नसलेल्या विद्यार्थ्यांना प्रति तास २१.८० डॉलर्स (अंदाजे १८०० रुपये) मिळतील, ज्यामुळे एकूण कमाई ७ लाख रुपयांपेक्षा जास्त होईल. यासोबतच, वर्ल्ड बँकेकडून कामासाठी लॅपटॉप आणि व्हिसा स्पॉन्सरशिपसारखे फायदेही दिले जातील. (World Bank Internship Offers)

या इंटर्नशिपदरम्यान, विद्यार्थ्यांना ॲसेट मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट, ऑपरेशन्स आणि रिस्क यांसारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये तीन-तीन आठवड्यांच्या रोटेशनमध्ये काम करण्याची संधी मिळेल. प्रत्येक रोटेशननंतर त्यांना एक प्रेझेंटेशन द्यावे लागेल आणि कार्यक्रमाच्या शेवटी, सर्व इंटर्न्स मिळून वर्ल्ड बँक ट्रेझरीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर एक ‘कॅपस्टोन प्रकल्प’ सादर करतील.

दोन वर्षांच्या कॉन्ट्रॅक्टवर नोकरीची संधी :

या इंटर्नशिपचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सर्वोत्तम उमेदवारांना ‘ज्युनियर ॲनालिस्ट’ (Junior Analyst) म्हणून दोन वर्षांच्या कॉन्ट्रॅक्टवर नोकरीची संधीही मिळू शकते. चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या (वित्त, अर्थशास्त्र, व्यवसाय) शेवटच्या वर्षात शिकणारे आणि डिसेंबर २०२६ ते सप्टेंबर २०२७ दरम्यान पदवी पूर्ण करणारे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. (World Bank Internship Offers)

इच्छुक आणि पात्र उमेदवार १२ ऑक्टोबर २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात. अर्जासोबत कव्हर लेटर आणि रेझ्युमे (PDF स्वरूपात) जोडणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी treasury.worldbank.org या अधिकृत वेबसाइटला भेट देता येईल.

News title : World Bank Internship Offers Over ₹7 Lakh Stipend

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now