Walmik Karad | बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर नेतेमंडळी आणि बीडमधील (Beed) नेत्यांच्या आरोपात नाव असलेल्या वाल्मिक कराडेने अखेर पोलिसांना शरणागती पत्करली आहे.
वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) शोधासाठी पोलिसांनी जंगजंग पछाडले होते. पण, नाट्यमयरीत्या आज वाल्मिक कराडने शरणागती पत्करली. एका एसयुव्हीमधून वाल्मिक कराड याने सीआयडी मुख्यालयात हजेरी लावली. त्यावेळी त्याच्यासोबत त्याचे काही कार्यकर्ते होते.
Walmik Karad कुठं होता?
वाल्मिक कराड हा मागील काही दिवसांपासून पुण्यातच असल्याची माहिती त्याच्या कार्यकर्त्याने दिली. सोमवारी, वाल्मिक कराड हा अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या मंदिरात गेला असल्याची माहिती या कार्यकर्त्याने दिली.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर संतोष देशमुख हत्याप्रकरणात बीड पोलीस आणि सीआयडीची पथके वाल्मिक कराड यांच्या मागावर होती. मात्र, वाल्मिक कराड यांनी तब्बल 23 दिवस पोलिसांना सहजपणे गुंगारा दिला.
खंडणीचा गुन्हा दाखल
वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात कोणताही गुन्हा नाही. त्यांच्याविरोधात केवळ पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याकडून खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आता सीआयडीचे अधिकारी वाल्मिक कराड याची चौकशी नेमकी कोणत्याप्रकारे करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा नोंदवला जाणार का, याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराड एकाच….’, भाजपा आमदार सुरेश धस यांनी दिली रोखठोक प्रतिक्रिया
सुरेश धस अखेर नरमले, ‘त्या’ वक्तव्याबाबत प्राजक्ता माळीची मागितली माफी
“गुन्हेगार स्वत: सरेंडर होत असेल तर मग पोलीस…”; देशमुखांच्या मुलीचा संतप्त सवाल
मी वाल्मिक कराड, न्यायदेवता देईल ती शिक्षा भोगण्यास तयार; स्वतःच व्हिडीओ शेअर करत पोलिसांना शरण






