सीआयडीच्या मोठ्या हालचाली, वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होणार?

On: January 6, 2025 3:30 PM
Walmik Karad
---Advertisement---

Walmik Karad l मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण प्रचंड चर्चेत आहे. कारण या हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अशातच या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड, मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांच्यासह इतर आरोपींवर याआधी देखील अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे या आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी होत आहे.

मोक्का कायदा लागल्यास काय कारवाई होते?

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींनी एकत्रितपणे कट रचुन देशमुख यांची हत्या केली आहे. त्यामुळे आता सीआयडीकडून या टोळीवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

या कायद्यानुसार, खून, खंडणी, अमली पदार्थाची तस्करी, सुपारी देणे, हप्ता, खंडणीसाठी अपहरण असे संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का लावला जातो. तसेच जर गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलीसांकडून प्रथम समज देखील दिली जाते. मात्र या गोष्टीचा आरोपीने गैरफायदा घेतला तर तो पोलिसांच्या रेकॅार्डवर येतो. त्यानंतर अशा आरोपींना अटक केली जाते.

मात्र तरीसुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास त्यावर तडीपारीची कारवाई करण्यात येते. यानंतरही आरोपीमध्ये जर सुधारणाझाली नाही तर त्यांच्यावर पोलीसांना मोक्का अंतर्गत कारावाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराडसह इतर आरोपींवर मोक्का लागण्याची शक्यता आहे.

Walmik Karad l मोक्का लागल्यावर आरोपींना काय शिक्षा मिळते? :

सर्वात महत्वाचं म्हणजे मोक्का लागल्यास आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही. तसेच भारतीय दंड विदान संहीतेच्या लावलेल्या कलमांखाली जेवढी शिक्षा असेल तीच शिक्षा मोक्काच्या कलम 3 (1) नुसार देता येईल. तसेच ही शिक्षा किमान 5 वर्षे ते जन्मठेपेपर्यंत देखील राहते.

याशिवाय आरोपींवर मोक्का लावल्यास किमान दंड हा पाच लाखांपर्यांतचा असतो. तसेच आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची देखील तरतूद या कायद्यात आहे.याशिवाय संघटीत गुन्हेगारी करुन जर आर्थिक फायदा घेतला जात असेल किंवा टोळी तयार करुन जर गुन्हेगरी करत असाल तर त्या संदर्भात मोक्काची तरतूद ही केली आहे.

News Title : Will Valmik Karad need Macoca Act

महत्वाच्या बातम्या –

भारतात HMPV व्हायरसची एन्ट्री होताच मार्गदर्शक सूचना जारी!

HMPV चा सर्वाधिक धोका लहान मुलांना?, देशात आतापर्यंत किती केसेस आढळल्या?

सावधान! HMPV चा पहिला रुग्ण भारतात आढळला; जाणून घ्या कशी काळजी घ्यावी

सरपंच हत्येप्रकरणी शरद पवारांनी उचललं सर्वात मोठं पाऊल; थेट…

खंडणी ते हाफ मर्डर..; वाल्मिकसह सुदर्शन घुले व सांगळेही अट्टल गुन्हेगार, गुन्ह्यांची यादीच समोर

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now