निलेश घायवळने पासपोर्टसाठी वापरले ‘हे’ नाव; पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

On: October 4, 2025 11:15 AM
Nilesh Ghaywal
---Advertisement---

Nilesh Ghaywal Case | कोथरूड गोळीबार प्रकरणात ‘मकोका’ कारवाईनंतर परदेशात पसार झालेल्या कुख्यात गुंड निलेश घायवळला (Nilesh Ghaywal) भारतात परत आणण्यासाठी पुणे पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे. पोलिसांनी त्याचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. पोलिसांच्या तपासात घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे आणि खोटी माहिती वापरल्याचे उघड झाले आहे. (Nilesh Ghaywal Case)

बनावट कागदपत्रे :

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शुक्रवारी (३ नोव्हेंबर) रोजी पुण्याच्या प्रादेशिक पासपोर्ट विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणावर चर्चा केली. कोथरूड गोळीबार प्रकरणात घायवळ परदेशात पसार झाला. घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी ‘गायवळ’ असे नाव असलेली कागदपत्रे सादर केली. ही बनावट कागदपत्रे अहिल्यानगर पोलिसांकडे सादर करून त्याने तत्काळ पासपोर्ट मिळवला, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

पासपोर्ट मिळवण्यासाठी त्याने अहिल्यानगरमधील पत्ता वापरला. मात्र, पुणे पोलिसांनी या पत्त्यावर छापा टाकला असता, तो पत्ता खोटा असल्याचे उघड झाले. घायवळने पासपोर्टसाठी अर्ज करताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्याच्यावर राज्यात किंवा इतर कोणत्याही परराज्यात एकही गुन्हा दाखल नाही, असा दावा केला होता. ही माहिती खोटी असल्याचे समोर आल्याने त्याच्यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे. (Nilesh Ghaywal)

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन :

घायवळने परदेशात जाण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाचाही भंग केल्याचे उघड झाले आहे.  यापूर्वी, घायवळवर ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई झाली होती. त्यावेळी न्यायालयाने त्याला काही अटी-शर्तींवर जामीन मंजूर करताना पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचे उल्लंघन करून, घायवळने परदेशात पळ काढला. ११ सप्टेंबरपासून तो परदेशात असल्याचे समोर आले. (Nilesh Ghaywal Case)

घायवळने ‘तत्काळ’ पासपोर्ट मिळवल्यानंतर, दिलेल्या पत्त्यावर तो वास्तव्यास नसल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी तसा शेरा नोंदवला. त्यामुळे पोलीस पडताळणी अपूर्ण राहिली. (Nilesh Ghaywal Case) परिणामी, पासपोर्ट कार्यालयाने घायवळला नोटीस बजावली होती, पण त्याने या नोटिशीलाही कोणतेही उत्तर दिले नाही. (Nilesh Ghaywal)
घायवळचा पासपोर्ट रद्द झाल्यानंतर त्याला फरफटत भारतात आणण्याचा (प्रत्यार्पणाचा) मार्ग पुणे पोलिसांना मोकळा होऊ शकतो.

News title : Will Pune Police bring Nilesh Ghaywal to India? Moves to cancel passport

Join WhatsApp Group

Join Now