Murder l दापोली (Dapoli) तालुक्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधांच्या (Illicit Relationship) आड येणाऱ्या पतीचा पत्नीनेच (Wife) प्रियकराच्या (Paramour) मदतीने खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नीलेश बाक्कर (वय ३७, रा. गिम्हवणे-उगवतवाडी, दापोली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नी नेहा आणि तिचा प्रियकर मंगेश चिंचघरकर (रा. पालगड) या दोघांना अटक (Arrest) केली आहे. मंगेश हा एसटीमध्ये चालक (ST Driver) म्हणून कार्यरत आहे. या घटनेमुळे दापोली तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहा आणि मंगेश यांचे अनैतिक संबंध होते. नीलेशला या संबंधांबद्दल समजल्यानंतर, त्याने विरोध केला. त्यामुळे, नेहा आणि मंगेश यांनी संगनमताने नीलेशचा काटा काढण्याचा कट रचला आणि त्याची हत्या केली.
Murder l नेमकं काय घडलं?
पोलिसांनी आरोपी महिला नेहा बाक्करला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता, तिने हत्येची कबुली दिली. प्रियकर मंगेश चिंचघरकर याला हाताशी धरून पतीची हत्या केल्यचं तिने सांगितलं. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी नेहा बाक्कर ज्या हॉटेलमध्ये कामाला होती, त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी ती तिच्या प्रियकरासह दोघेजण हॉटेलमधून बाहेर पडत असल्याचे दिसून आलं. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. नेहाने एका बियर शॉपीवरून बियर खरेदी केल्याचं देखील सीसीटीव्हीमध्ये दिसून आलं.
हा सगळा घटनाक्रम जोडल्यानंतर पोलिसांनी नेहाला ताब्यात घेत तिची चौकशी केली. तिनेच पतीला बिअर पाजून प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची कबुली दिली. आरोपी प्रियकर मंगेश चिंचघरकर हा बस चालक आहे. तो मंडणगड डेपोची बस दापोलीला घेऊन आला असता पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली आहे. आरोपींनी निलेशची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह विहिरीत फेकला होता. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या कटात आणखी किती जण सहभागी होते, याचा तपास पोलीस करत आहेत.
News Title: Wife Murders Husband with Help of Lover in Dapoli
महत्वाच्या बातम्या-
एसटी महामंडळाकडून अधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश, आता अतिमोबाईल वापराल तर…
‘चार मुले जन्माला घाला’; ‘या’ बड्या नेत्याचं ब्राह्मण समाजाला आवाहन
शेतात अर्धांगवायूचा झटका, मालकाने हाक देताच बैल सर्जा मतदीला धावला
‘हातात लांब ब्लेड होता, तो जेहबाबाकडे जाऊ लागला’; केअरटेकरने सांगितला हल्ल्याचा थरार
SBI च्या करोडो ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी!






