Reena Sindhu | एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उत्तराखंडमधील कोटद्वार येथे रीना सिंधू (Reena Sindhu) या महिलेने आपल्या प्रियकर परितोष कुमार याच्या मदतीने पती रवींद्र कुमार (Ravindra kumar) याची निर्घृण हत्या करत मृतदेह जंगलात फेकल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
या घटनेने केवळ परिसरातच नव्हे, तर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विशेष म्हणजे, या हत्येमागे मालमत्तेचा वाद, आर्थिक व्यवहार आणि परस्पर संबंधातील फसवणूक असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
3 कोटींच्या घरावरून सुरु झाला वाद :
मृत रवींद्र कुमार (Ravindra kumar) हे मूळचे उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील रहिवासी होते. त्यांनी त्यांच्या वडिलोपार्जित जमिन विकून राजोकरी (दिल्ली) येथून मुरादाबादमध्ये तीन मजली, 3 कोटी किमतीचं घर खरेदी केलं होतं. या घरातून महिन्याला लाखोंचं भाडं मिळत होतं. मात्र, रवींद्रवर कर्जाचा बोजा होता आणि त्यासाठी ते घर विकायचं ठरवलं. मात्र, पत्नी रीना सिंधू याला विरोध करत होती. याच वादातून खूनाचा कट रचण्यात आला.
तपासात उघड झालेलं धक्कादायक सत्य म्हणजे, परितोष कुमार नावाचा व्यक्ती फिजिओथेरपीसाठी रीनाकडे येत असे. तिथेच त्यांचं अनैतिक संबंधात रूपांतर झालं. काही महिन्यांतच त्यांनी रवींद्रला संपवण्याचा निर्णय घेतला. रवींद्रची हत्या करून मृतदेह कोटद्वारजवळील जंगलात फेकण्यात आला. (Reena Sindhu)
Reena Sindhu | हत्या, मृतदेह विल्हेवाट आणि अटक :
रवींद्रचा मृतदेह काही दिवसांपूर्वी जंगलात आढळून आला होता. स्थानिक पोलिसांनी सुरू केलेल्या तपासात मृताची ओळख पटवण्यात आली. चौकशीतून पत्नी रीना आणि प्रियकर परितोषचा सहभाग स्पष्ट झाला आणि पोलिसांनी दोघांनाही अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रीनाने अपराध कबूल केला असून हत्या केवळ मालमत्तेवर ताबा मिळवण्यासाठी केल्याचे मान्य केले आहे.
कुटुंब उध्वस्त, परिसरात भीतीचं वातावरण :
रवींद्र आणि रीनाला दोन मुलं असून, ते उत्तराखंडमधील दोईवाला येथे भाड्याने राहत होते. त्यांचं वैवाहिक आयुष्य बाहेरून पाहायला सामान्य वाटत होतं. मात्र, घरात सुरू असलेल्या द्वेषाचे रूप इतकं भयंकर असेल याची कल्पनाही कुणाला नव्हती. (Reena Sindhu)
शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक पुरुष वारंवार घरी येत होता आणि तो रीनाचा नातेवाईक असल्याचं सांगत असे. प्रत्यक्षात तो तिचा प्रियकर असल्याचे आता उघड झालं आहे. मृताच्या नातेवाईकांनी या घटनेमुळे मोठा धक्का बसल्याचं म्हटलं आहे.






