पुरुषांपेक्षा महिलांना झोपेची अधिक गरज, वैज्ञानिक संशोधनातून समोर आलं झोपेचं खास कनेक्शन

On: November 7, 2025 11:00 AM
Women Sleep
---Advertisement---

Women Sleep | झोप ही आपल्या शरीराचं रिचार्ज बटण मानली जाते. दिवसाच्या थकव्याला विसरून पुन्हा नव्या ऊर्जेसह दिवसाची सुरुवात करण्यासाठी पुरेशी झोप घेणं अत्यावश्यक आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, महिलांना पुरुषांपेक्षा थोडी जास्त झोप आवश्यक असते? अलीकडच्या संशोधनातून या गोष्टीला वैज्ञानिक पुष्टी मिळाली आहे. (Women Sleep)

अभ्यासानुसार, महिलांना सरासरी पुरुषांपेक्षा 10 ते 15 मिनिटं अधिक झोपेची आवश्यकता असते. त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे महिलांच्या शरीरातील वारंवार होणारे हार्मोनल बदल आणि त्यांच्यावर असलेली घरगुती तसेच व्यावसायिक जबाबदाऱ्या.

हार्मोनल बदल आणि झोपेचा पॅटर्न :

तज्ञांच्या मते, महिलांच्या शरीरात दर महिन्याला मासिक पाळी, गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती (मेनोपॉज) यांसारखे बदल होत असतात. या काळात शरीरात हार्मोनल चढउतार होत असल्याने झोपेचा पॅटर्न बिघडतो. त्यामुळे शरीराला पुनःशक्ती मिळवण्यासाठी जास्त विश्रांतीची गरज भासते.

गर्भधारणेदरम्यान झोपेचा दर्जा कमी होतो, तर मेनोपॉजच्या काळात झोप न लागणे आणि अनिद्रा ही सामान्य समस्या होते. त्यामुळे महिलांनी झोपेच्या वेळेला गांभीर्याने घेणं आणि ठरावीक वेळेवर विश्रांती घेणं अत्यंत गरजेचं आहे. (Women Sleep Research)

Women Sleep | मानसिक ताण, जबाबदाऱ्या आणि विश्रांतीची गरज :

आजच्या काळात महिला घरगुती कामासोबतच नोकरी, व्यवसाय आणि कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळतात. सततच्या या शारीरिक आणि मानसिक ताणामुळे मेंदू थकतो आणि शरीराला पुनः ऊर्जा मिळवण्यासाठी अधिक झोपेची आवश्यकता निर्माण होते.

तज्ञ सांगतात की, झोपेची कमतरता महिलांच्या मूड, एकाग्रता, आणि हार्मोनल संतुलनावर परिणाम करते. नियमित झोप घेतल्यास मूड चांगला राहतो, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि मानसिक आरोग्य सुधारते. त्यामुळे महिलांनी झोपेला दुर्लक्षित न करता ती आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनवावा, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

थोडक्यात सांगायचं तर, महिलांनी स्वतःसाठी थोडा वेळ काढून, नियमित झोप आणि विश्रांतीला प्राधान्य द्यायला हवं. कारण, निरोगी शरीर आणि शांत मन यासाठी ‘योग्य झोप हीच खरी औषध’ आहे.

News Title: Why Women Need More Sleep Than Men? Study Reveals the Real Reason Behind It

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now