रोहित शर्मा फिल्डिंग का करत नाही? मुंबई इंडियन्सनं सांगितल कारण

On: May 6, 2025 4:12 PM
ICC ODI Ranking
---Advertisement---

Rohit Sharma l आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी पुन्हा उंचावली असून, प्लेऑफसाठी संघ जोरदार दावेदार ठरत आहे. मात्र, संघाच्या यशात माजी कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) केवळ फलंदाज म्हणून सहभागी होताना दिसतोय, त्यामुळे चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न – रोहित फिल्डिंग का करत नाही?

इम्पॅक्ट सब म्हणून रोहितचा वापर :

मुंबई इंडियन्सने (mumai indians) या हंगामात रोहित शर्माचा (Rohit Sharma) वापर प्रामुख्याने ‘इम्पॅक्ट सब’ (Impact Substitute) म्हणून केला आहे. त्यामुळे तो फक्त बॅटिंगसाठी मैदानात उतरतो आणि फिल्डिंगपासून वंचित राहतो. याबाबत स्पष्टता देताना मुंबई इंडियन्सचे हेड कोच महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) यांनी खुलासा केला आहे.

जयवर्धने यांनी सांगितले की, रोहितला चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान किरकोळ दुखापत झाली होती. हंगामाच्या सुरुवातीला तो काही सामन्यांत फिल्डिंग करत होता, पण ती दुखापत पुन्हा वाढू नये म्हणून ही खबरदारी घेतली गेली आहे. “आमच्यासाठी रोहितची बॅटिंग जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळे त्याला फिट ठेवणे आवश्यक आहे,” असं जयवर्धने म्हणाले.

Rohit Sharma l फिल्डिंगसाठी गरज अ‍ॅक्टिव्ह खेळाडूंची :

टीमच्या रचनेबाबत बोलताना जयवर्धने म्हणाले, “संघातील अनेक खेळाडू दुहेरी भूमिका पार पाडत आहेत. काही फास्ट बॉलर्स बाऊंड्रीजवळ फिल्डिंग करत आहेत. अशा वेळी फिल्डिंगसाठी वेगानं धावू शकणारे खेळाडू गरजेचे असतात.” त्यामुळे रोहितला फिल्डिंगपासून बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

जयवर्धने यांनी रोहितच्या भूमिकेचं कौतुक करत सांगितलं की, “मैदानावर नसला तरी रोहित नेहमीच डगआउटमध्ये उपस्थित असतो. टाईमआउटच्या वेळी मैदानात जाऊन खेळाडूंना सूचना देतो. त्याचा अनुभव संघासाठी महत्त्वाचा आहे.” त्यामुळे रोहित मैदानावर नसला तरी टीममध्ये त्याची भूमिका ठळक आहे.

News Title: Why Rohit Sharma Isn’t Fielding in IPL 2025?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now