‘इथे मराठीची गरज काय?’, अबू आझमींचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

On: October 1, 2025 5:16 PM
Abu Azmi
---Advertisement---

Abu Azmi | समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (Abu Azmi) यांनी भिवंडीत “इथे मराठीची काय गरज?” असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन वातावरण तापले असून भाजप नेत्या (BJP) नवनीत राणांनी आझमींना करारा जबाब दिला आहे. त्यांनी पाकिस्तानचा उल्लेख करत भडक टोला लगावला आणि इशारा दिला की, “ज्यांना मराठी भाषा आवडत नाही, त्यांनी महाराष्ट्र सोडून जावं.”

अबू आझमीचे वादग्रस्त वक्तव्य :

दरम्यान, भिवंडीमध्ये (Bhiwandi) पत्रकारांशी बोलताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “ही भिवंडी आहे इथे मराठीची काय गरज?” असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “मराठी आणि हिंदीत अंतर काय आहे. मी मराठी पण बोलू शकतो. पण ही भिवंडी आहे. इथं मराठीची गरज काय आहे ?” अशा प्रकारचे अकलेचे तारे अबू आझमींनी तोडले आहेत. प्रकाश झोतात राहण्यासाठी अधून मधून असे वादग्रस्त वक्तव्य आझमी नेहमी करत असतात. यापूर्वीही त्यांनी मराठी भाषेबाबत असे वक्तव्य केलेले आहेत. (Abu Azmi Statement)

याबाबत आझमींना भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी उत्तर दिले आहे. नवनीत राणांनी म्हटले की, “ज्यांना मराठी भाषा आवडत नाही. त्यांनी महाराष्ट्र सोडून चालल जावं”, असा जहरी टोला भाजप नेत्या नवनीत राणा यांनी अबू आझमींना लगावला.

Abu Azmi | अबू आजमी यांनी नवीन नवीन भानगडी करू नये :

“महाराष्ट्र म्हणून इथली भाषा म्हणून पहिला सन्मान केला पाहिजे. हे लोक तर म्हणतात पाकिस्तान देखील चांगला आहे. पाकिस्तानसोबत सामना असला की यांच्याकडून एकही वक्तव्य येत नाही. मग यांच्याकडून काय अपेक्षा ठेवावी”, असे नवनीत राणा (Navneet Rana) यांनी म्हटले आहे.

तर, “अबू आजमी यांनी नवीन नवीन भानगडी करू नये. इथं मराठी भाषा पहिली आहे, त्याला कोणी छेडछाड करू नये. नाहीतर अबू आजमी याना जशास तसे उत्तर दिले जाईल”, असा इशारा आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी दिला.

शिवसेनेने दिले उत्तर :

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक  (Pratap Saranaik) यांनीही या वादात उडी घेतली आणि अबू आझमींवर टीका केली. त्यांनी म्हटले की, “भिवंडी काय अबू आझमीच्या बापाची आहे ? मुंब्रा भिवंडीला काहीतरी जाऊन बरळतो. आमच्या भिवंडीतून शिवसेनेचे आमदार निवडून येत होते, भिवंडी आमचा बालेकिल्ला होता. असे वक्तव्य करु नये, भिवंडीतील जनता चोख उत्तर देईल “,असे त्यांनी म्हटले.

तसेच आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी म्हटले की, ” महाराष्ट्रात मराठी बोललं पाहिजे. भिवंडी काय, गोवंडी काय, चंडी असेल तरी मराठी बोलली पाहिजे. अबू आझमीवर राऊतांची पोपटपंची आणि मनसेची कुठली भाषा हे स्पष्ट करावं”, असे ते म्हणाले.

या वादामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असून, भविष्यात हा मराठी- हिंदी वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

News Title :- Why is Marathi needed here? – Abu Azmi’s controversial statement again

Join WhatsApp Group

Join Now