Navjot Sidhu IPL comment l प्रसिद्ध समालोचक नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा त्यांच्या बिनधास्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. आयपीएलमुळे भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर कशी उंचावली आहे, यावर भाष्य करताना त्यांनी मिशेल स्टार्कच्या बोलीबाबत एक मुद्दा उपस्थित केला — “ऑस्ट्रेलियात मिचेल स्टार्कला २१ कोटी रुपये कोण देईल? असा सवाल उपस्थित केला आहे”
सिद्धू यांचं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल :
सिद्धू यांचे हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. त्यांनी आयपीएलच्या जागतिक प्रभावावर भर देत म्हटले की, “पूर्वी आपण इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी जात होतो. आज जगभरातील दिग्गज खेळाडू भारतात येतात, कारण इथं आयपीएल आहे.”
सिद्धू म्हणाले, “आयपीएलमुळे भारताने क्रिकेट क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये स्टार्कला इतकी रक्कम कोणी देईल? हे केवळ मार्केटिंग मॅनेजरचं स्वप्न आहे.” त्यासोबतच त्यांनी आयपीएलच्या माध्यमातून भारताच्या आर्थिक आणि ब्रँड मूल्याची भरभराट झाल्याचे सांगितले.
“भारतीय क्रिकेट इतकं मोठं आहे की ते एस्किमोंना बर्फ आणि अरबांना वाळू विकू शकतं,” अशा शब्दांत त्यांनी IPL ची महत्ता उलगडून दाखवली. या विधानामुळे अनेक क्रिकेटप्रेमी आणि नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा नवा विषय निर्माण झाला आहे.
Navjot Sidhu IPL comment l तरुण पिढी विरुद्ध सुवर्ण पिढी? :
IPL 2024 हंगामात अनेक तरुण खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. अभिषेक शर्मा, अंगकृष रघुवंशी यांसारख्या नवोदितांनी आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केलं. यावर बोलताना सिद्धू म्हणाले, “तरुण पिढी सुवर्ण पिढीची जागा घेण्यासाठी सज्ज आहे. त्यांच्यामध्ये कोणताही संघर्ष नाही, तर परस्पर सुसंवाद आहे. भारतासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.”
2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून स्टार्कने शानदार प्रदर्शन करत संघाच्या जेतेपदात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. मात्र, 2025 च्या हंगामात केकेआरने त्याला रिलीज केलं आणि दिल्ली कॅपिटल्सने त्याला 11.75 कोटी रुपयांना खरेदी केलं. त्याच्या या उच्च बोलीवरून सिद्धूंनी मुद्दाम हायलाइट केलं की, “हे फक्त भारतातच शक्य आहे.”






