Dhananjay Munde l बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांनी प्रचंड आरोप केले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद देऊ नये अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. अशातच आता बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे यांचा पत्ता कट होणार आहे.
अखेर बीडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय झाला? :
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पालकमंत्री पदावरून मंत्री धनंजय मुंडे यांचा पत्ता कट झाला असल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांना देखील पालकमंत्री पदाची संधी नाकारण्यात आल्याची महत्वपूर्ण माहिती मिळाली आहे.
कारण मंत्री धनजंय मुंडे यांना बीडचे पालकमंत्री पद देण्यात येऊ नये अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत होती. तसेच बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी अशी मागणी देखील वारंवार करण्यात येत होती. मात्र, आता बीडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चा करून घेतला असल्याचं समजत आहे.
Dhananjay Munde l कोण होणार बीडचा पालकमंत्री? :
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना देखील पालकमंत्री पदापासून लांब ठेवण्यात आले आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण तसेच पक्षातील अंतर्गत रस्सीखेच म्हणून बीडच्या पालकमंत्री पदी अजित पवार यांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र अद्याप यासंदर्भात अधिकृत घोषणा केली नाही. त्यामुळे लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.
News Title – Who will be the Guardian Minister of Beed?
महत्त्वाच्या बातम्या-
नोंदणी विवाहासाठीची प्रक्रिया काय असते?, अर्ज ते कागदपत्रे सर्व माहिती जाणून घ्या
वाल्मिक कराडने केली सर्वात मोठी मागणी!
लाडकी बहीण योजनेत मोठा बदल, घरात ही गोष्ट असेल तर मिळणार नाही लाभ
आज छगन भुजबळ-शरद पवार एकत्र येणार; यामागचं कारण काय?
वाल्मिक कराड शरण आला ‘त्या’ गाडीबाबत धक्कादायक दावा समोर!






