‘बिग बॉस’मध्ये पहिल्यांदाच लेस्बियन कपलची एन्ट्री! प्रवेश करताच त्यांच्या लव्हस्टोरीची चर्चा

On: August 6, 2025 11:04 AM
Bigg Boss Adila and Fatima
---Advertisement---

Bigg Boss | ‘बिग बॉस’ हा टेलीव्हिजनवरील एक वादग्रस्त आणि लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. त्यातील प्रत्येक सीझनमध्ये काहीतरी वेगळं, धक्कादायक घडत असतं. आता ‘बिग बॉस मल्याळम सीझन 7’मधील एका घटनेमुळे पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. या शोमध्ये एका लेस्बियन कपलने प्रवेश घेतल्यानंतर खळबळ उडाली आहे. या दोघींची ओळख म्हणजे आदिला आणि फातिमा. (Bigg Boss Adila and Fatima)

सौदी अरेबियामधून प्रेमाचा प्रवास :

आदिला आणि फातिमा यांची पहिली भेट सौदी अरेबियामध्ये झाली होती. त्या वेळी त्या दोघीही १२ वीमध्ये शिकत होत्या. शालेय जीवनात त्यांची मैत्री झाली आणि ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. विशेष म्हणजे त्यांचे कुटुंबीय एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते. पण या प्रेमसंबंधाची स्वीकारार्हता कुटुंबांकडून मिळाली नाही.

जेव्हा दोघींनी आपल्या नात्याबाबत कुटुंबीयांना सांगितलं, तेव्हा त्याचा तीव्र विरोध झाला. त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला, त्यांना वेगळं करण्यात आलं. पण या साऱ्या अडथळ्यांवर मात करत, आदिलाने आपल्या प्रेमासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. तिने केरळ उच्च न्यायालयात हैबियस कॉर्पस याचिका दाखल करत फातिमाला जबरदस्तीने वेगळं केलं जात असल्याचा आरोप केला.

तिच्यावर धर्मांतर थेरपी केल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला होता. न्यायालयाने दोघींशी खाजगीत संवाद साधून त्यांच्या बाजूने निकाल दिला. LGBTQ समुदायानेही या दोघींच्या समर्थनार्थ आपला आवाज उठवला.

Bigg Boss | ‘बिग बॉस 7’मध्ये आदिला आणि फातिमा :

या लढ्यांनंतर आदिला आणि फातिमा आता मल्याळम ‘बिग बॉस सीझन 7’मध्ये सहभागी झाल्या आहेत. मोहनलाल यांच्या सूत्रसंचालनाखालील या शोमध्ये एकूण 19 स्पर्धक आहेत. या कपलव्यतिरिक्त अप्पानी सारथ, सारिका, रेणु सुधी, शैथ्या, गिजेल ठकराल, रेना फातिमा अशा अनेक स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. (Bigg Boss Adila and Fatima)

त्यांच्या प्रेमकहाणीने आणि संघर्षाने फक्त सोशल मीडियावरच नव्हे तर समाजातही मोठी चर्चा निर्माण केली आहे. लेस्बियन कपल म्हणून त्यांनी ‘बिग बॉस’सारख्या व्यासपीठावर खुलेपणाने प्रवेश करून LGBTQ समुदायासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे.

News Title : Who Is The Lesbian Couple In Bigg Boss Malayalam 7? Adila and Fatima’s Love Story, Family Drama & Court Battle

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now