महायुतीचं सरकार आल्यावर मुख्यमंत्री कोण?; अमित शहांनी अखेर सांगूनच टाकलं

On: November 10, 2024 2:56 PM
Ajit Pawar
---Advertisement---

Amit Shah | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात लढत होत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात लढत होत आहे. दोन्ही आघाडी आणि युती सरकारकडून मुख्यमंत्री कोण?, असा सवाल केला जात आहे.

महायुतीचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी महायुतीचे पुढील मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाचे उत्तर दिलं आहे. भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन आज झालं. त्यावेळी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अमित शाह (Amit Shah) यांनी पुढील मुख्यमंत्री कोण? हे सांगितलं.

महायुतीचा मुख्यमंत्री कोण?

सध्या महायुतीचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत. निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली जात आहे. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार? हे तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेणार आहे, असं अमित शहा यांनी म्हटलंय.

अमित शहांची काँग्रेसवर टीका

महायुतीचे सरकार आल्यानंतर आता धर्मांतर विरोधात कठोर कायदा करणार आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवर शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवल्यावर टीका केली.

काँग्रेस सरकार असताना शेतमाल किमान आधारभूत किंमतीवर किती घेतला गेला. आता महायुती सरकार असताना किती घेतला गेला, त्याचा डेटा डाउनलोड करून पहा. तसेच राज्यात सर्वाधिक दंगे आघाडीच्या सरकारमध्ये झाले आहेत. संघावर बंदी आणण्याचे तीन वेळा प्रयत्न काँग्रेसने केले. परंतु प्रत्येक वेळी संघ अधिक मजबूत होऊन पुढे आला आहे. आता तर काँग्रेसचे सरकार येणार नाही? यामुळे हा प्रश्नच येत नाही पूर्ण बहुमताने महायुतीचे सरकार येणार आहे, असे अमित शाह (Amit Shah) म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘माझं आणि हार्दिकचं अजूनही…’; घटस्फोटानंतर नताशाकडून नवा खुलासा

‘महिलेला खोलीत आणलं, माझे कपडे काढले’; आमदाराच्या मुलासोबत घडला भयंकर प्रकार

2025 पर्यंत ‘या’ राशींच्या लोकांना मिळेल चिक्कार पैसा!

पुण्यात आमदाराच्या मुलाचं अपहरण, निर्वस्त्र करुन विवस्त्र महिलेसोबत फोटो काढले!

निलंग्यात रामदास आठवलेंच्या उपस्थितीत संविधान सन्मान सभा!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now