सतीश सालियान यांच्यासोबत संबंध असलेली ‘ती’ महिला कोण?, धक्कादायक माहिती समोर!

On: April 3, 2025 1:18 PM
satish salian
---Advertisement---

Satish Salian | दिशा सालियन आत्महत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली असून, तिच्या लॅपटॉपमधून वडील सतीश सालियान (Satish Salian) यांचा व्हॉट्सअ‍ॅप डेटा सापडल्याचं उघड झालं आहे. हा डेटा आधीच्या एसआयटी तपासादरम्यान सापडला होता. त्यामुळे दिशाच्या मृत्यूमागील कारणांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

नेमकं प्रकरण काय?

दिशाला तिच्या वडिलांचा एका महिलेशी असलेला संबंध असल्याचा संशय होता. ती महिला सतीश सालियान (Satish Salian) यांच्या दिवंगत मित्राची पत्नी होती, ज्याला मदतीची गरज होती. मात्र, ही माहिती दिशाला तिच्या वडिलांकडून न मिळता, त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपमधून मिळाली. सतीश यांना हे माहीत नव्हतं की, दिशा त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर नजर ठेवतेय. त्यांनी एका मित्राच्या माध्यमातून त्या महिलेला 3 हजार रुपये पाठवले, ज्याचा स्क्रीनशॉट दिशाच्या लॅपटॉपवर दिसला आणि त्यामुळे ती अस्वस्थ झाली.

2 जून 2020 रोजी दिशाने वडिलांना याबाबत थेट जाब विचारला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. 4 जून रोजी दिशा घर सोडून मालाडच्या (Malad Malvani) दिशेनं निघाली. तिने तिच्या मित्रांना याबाबत माहिती दिली होती. पोलिसांनी तिच्या मित्रांची चौकशी केल्यानंतर त्यांनीही हे स्पष्ट केलं की, दिशा तिच्या वडिलांच्या वागणुकीमुळे मानसिक तणावात होती. सतीश यांनी सांगितलं की, लोणचं व्यवसाय सुरू करताना मित्राच्या निधनानंतर त्यांनी फक्त माणुसकीच्या नात्याने त्या महिलेला मदत केली होती.

सीबीआय तपासाची मागणी-

पूर्वीच्या एसआयटी तपासात दिशा आणि तिच्या वडिलांमधील मतभेद, आर्थिक मदत, वाद आणि लॅपटॉप डेटा याचा सविस्तर आढावा घेण्यात आला होता. मात्र आता पुन्हा एकदा या प्रकरणात तपास व्हावा, अशी मागणी सतीश सालियान यांनी मुंबई हायकोर्टात केली आहे. त्यांनी (Aditya Thackeray), (Dino Morea), (Suraj Pancholi) यांच्यावर गंभीर आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी याचिकेतून केली आहे.

याचिकेमध्ये दिशा सालियन प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, किशोरी पेडणेकर यांच्यावर कुटुंबावर दबाव टाकल्याचा गुन्हा दाखल करावा, शवविच्छेदनाचे चित्रीकरण आणि कागदपत्रे उघड करावीत, तसेच आरोपींचे मोबाईल टॉवर लोकेशन तपासण्यात यावं, अशी मागणी आहे. दिशाचा फोन आणि लॅपटॉप सध्या तिचा प्रियकर रोहन रॉयकडे (Rohan Rai) असून, तो तिच्या कुटुंबाकडे देण्यात यावा, असाही आग्रह करण्यात आला आहे.

News Title – Who is ‘that’ woman who is in a relationship with Satish Salian?

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now