सुदर्शन घुले अन् सुधीर सांगळेच्या मागील 10 वर्षाच्या गुन्ह्यांची यादी समोर!

On: January 4, 2025 12:58 PM
Sudarshan Ghule
---Advertisement---

Sudarshan Ghule l बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण प्रचंड गाजलं आहे. कारण या घटने मागे वाल्मिक कराड कनेक्शन असल्याची माहिती मिळाली आहे. अशातच आज या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या प्रकरणातील सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे नेमके कोण आहेत? तसेच त्यांच्यावर आतापर्यंत कोणते गुन्हे दाखल आहेत? यासंदर्भात माहिती मिळाली आहे.

सरपंच हत्या प्रकरणाला वेग :

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा 31 डिसेंबर 2024 ला पोलिसांना शरण आला होता. त्यानंतर त्याला केज न्यायालयाने 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशातच आता या घटनेतील तीन पैकी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

याशिवाय मुख्य आरोपी सुदर्शन घुले याला पोलिसांनी अटक देखील केली आहे. तर सिद्धार्थ सोनवणेला देखील मुंबईतून ताब्यात घेतलं असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच सरपंच संतोष देशमुख यांचं लोकेशन देणारा आणखी डॉक्टरला देखील पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यामुळे आता या सर्वांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

Sudarshan Ghule l सुदर्शन घुले व सुधीर सांगळे कोण? :

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचं वय हे 26 वर्ष आहे. सुदर्शन घुलेवर मागील 10 वर्षांत तब्बल 10 गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये मारहाण, अपहरण, चोरी, खंडणी आणि खुनाचा प्रयत्न तसेच फूस लावून पळवून नेल्याचे गुन्हे दाखल आहेत. अशातच आता सरपंच हत्या प्रकरणी देखील त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दुसरा आरोपी सुधीर सांगळे हा आहे. सुधीर सांगळेच वय हे 22 वर्ष आहे. तसेच आता आरोपी सांगळेवर खुनातील सहभागाचा गुन्हा दाखल करण्यात आला. कारण आवादा कंपनीकडे दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी त्याच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

News Title :  Who is Sudarshan Ghule & Sudhir Sangale

महत्त्वाच्या बातम्या-

घुले अन् सांगळेचा ठावठिकाणा कसा लागला?, सरपंच हत्येमागील मास्टरमाईंड दुसराच?

संतोष देशमुख हत्या प्रकरणात डॉक्टरला अटक, त्याचा नेमका रोल काय?

संतोष देशमुख हत्या प्रकरण…; अखेर सुदर्शन घुलेच्या मुसक्या आवळल्या?

‘त्या’ लाडक्या बहीणींचे पैसे पुन्हा सरकारजमा; कारण…

विष्णू चाटेनं अखेर तोंड उघडलं, वाल्मिक कराडबाबत दिली अत्यंत धक्कादायक कबुली

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now