CSK ला मिळाला ‘नवा धोनी’! तब्बल 14.20 कोटींची बोली लागलेला कार्तिक शर्मा कोण आहे?

On: December 16, 2025 6:25 PM
Who is Kartik Sharma
---Advertisement---

Who is Kartik Sharma | आयपीएल 2026 च्या मिनी लिलावात युवा खेळाडूंवर पैशांचा अक्षरशः पाऊस पडताना पाहायला मिळाला. प्रशांत वीर आणि आकिब नबी दारनंतर आता सर्वाधिक चर्चेत आलेलं नाव म्हणजे कार्तिक शर्मा. अवघ्या 30 लाख रुपयांची बेस प्राइस असलेल्या या अनकॅप्ड खेळाडूवर तब्बल 14.20 कोटी रुपयांची बोली लागली असून, चेन्नई सुपर किंग्जने (CSK) त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं आहे. ( IPL 2026 Auction News

या बोलीमुळे कार्तिक शर्मा हा आयपीएलच्या इतिहासातील संयुक्तरित्या सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे, विकेटकीपर-फलंदाज असलेल्या कार्तिकची तुलना थेट एम. एस. धोनी यांच्याशी केली जात असून, ‘चेन्नईला नवा धोनी मिळाला’ अशी चर्चा क्रिकेटविश्वात सुरू आहे.

कार्तिक शर्मासाठी रंगली जोरदार चुरस :

कार्तिक शर्मासाठी सर्वात आधी मुंबई इंडियन्सने बोली लावली. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांनीही आक्रमक पवित्रा घेतला. काही वेळाने लखनऊने माघार घेतली, मात्र चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात जोरदार चुरस रंगली. अखेर चेन्नईने 14.20 कोटींची मोठी बोली लावत कार्तिकवर शिक्कामोर्तब केलं. (Who is Kartik Sharma)

फक्त 19 वर्षांचा कार्तिक शर्मा भविष्यात धोनीच्या जागी विकेटकीपिंग करताना दिसू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याच कारणामुळे चेन्नईने त्याच्यावर एवढी मोठी रक्कम खर्च केल्याचं बोललं जात आहे.

Who is Kartik Sharma | कोण आहे कार्तिक शर्मा? :

कार्तिक शर्मा हा राजस्थानकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. तो आक्रमक फलंदाजी आणि वेगाने धावा काढण्यासाठी ओळखला जातो. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26 मध्ये त्याने राजस्थानसाठी 5 सामन्यांत 160 च्या स्ट्राईक रेटने 133 धावा केल्या आहेत. विशेषतः डेथ ओव्हर्समध्ये सामना फिरवण्याची क्षमता असलेला कार्तिक सध्या फार कमी खेळाडूंमध्ये गणला जातो. ( IPL 2026 Auction News)

कार्तिक शर्माने अंडर-14 आणि अंडर-16 स्तरावरही राजस्थानचे प्रतिनिधित्व केलं आहे. आतापर्यंत त्याने 12 टी-20 सामन्यांत 334 धावा केल्या असून, त्याचा स्ट्राईक रेट सुमारे 163 इतका आहे. विकेटकीपर-फलंदाज म्हणून तो दोन्ही आघाड्यांवर प्रभावी ठरत आहे.

धोनी निवृत्त झाल्यानंतर चेन्नईसाठी दीर्घकालीन विकेटकीपर म्हणून कार्तिक शर्मा हा उत्तम पर्याय ठरू शकतो, असा विश्वास संघ व्यवस्थापनाने दाखवला आहे. त्यामुळेच IPL 2026 च्या लिलावात कार्तिक शर्मावर कोट्यवधींची बोली लागली.

News Title: Who is Kartik Sharma? CSK Buys Young Wicketkeeper for ₹14.20 Crore in IPL 2026 Auction

कार्तिक शर्मा, चेन्नई सुपर किंग्ज, IPL 2026 लिलाव, नवा धोनी, अनकॅप्ड खेळाडू
Kartik Sharma IPL, CSK New Player, IPL 2026 Auction News, New MS Dhoni

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now