चीनमध्ये नव्या व्हायरसचा धुमाकूळ; WHO ने दिली अत्यंत धक्कादायक बातमी

On: January 5, 2025 12:45 PM
HMPV
---Advertisement---

HMPV | सोशल मीडियावर काही दिवसांपासून चीनच्या रुग्णालयात गर्दी होत असल्याचे व्हीडिओ व्हायरल होत आहेत. त्यामध्ये रुग्णांना फ्लूसारखी लक्षणं दिसत असल्याचं समोर आलं. पुन्हा एकदा नव्या विषाणूचा धोका निर्माण होण्याची चर्चा सुरू झाली. त्याबाबत चिंता व्यक्त केली जाऊ लागली.

चीनमध्ये नव्या व्हायरसचा धुमाकूळ

चीनमध्ये पुन्हा एकदा नवीन विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे समोर येत आहेत. हा विषाणू प्रामुख्याने 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये होतो. ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (HMPV) नावाच्या या विषाणूच्या संसर्गाची अधिक प्रकरणे उत्तर चीनमध्ये नोंदवली जात आहेत.

चीनचे सरकारी संकेतस्थळ ग्लोबल टाइम्सनुसार, उत्तर चीनच्या काही भागांबरोबरच बीजिंग, दक्षिण पश्चिम भागातील चोंगकिंग शहर, दक्षिणी चीनचा गुआंगदोंग प्रांत या ठिकाणीही एचएमपीव्हीची (HMPV) प्रकरणं समोर आली आहेत.

चीनचा नवीन विषाणू ह्युमन मेटाप्युमोव्हायरस, ज्याला HMPV देखील म्हणतात, हा एक प्रकारचा सामान्य श्वसन विषाणू आहे जो सर्व वयोगटातील लोकांमध्ये पसरू शकतो. या विषाणूचा वृद्ध आणि लहान मुलांवर जास्त परिणाम होण्याची शक्यता आहे.

HMPV | नव्या व्हायरसची लक्षणे

जर तुम्ही व्हायरसने संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलात तर तुम्हालाही या विषाणूची लागण होऊ शकते. त्याची काही सामान्य लक्षणे आहेत- नाक वाहणे, घसा खवखवणे, डोकेदुखी, थकवा, खोकला, ताप किंवा थंडी वाजणे.

WHO ने पुढे इशारा दिला की जागतिक पारदर्शकता आणि सहकार्याशिवाय जग भविष्यातील साथीच्या रोगांसाठी असुरक्षित राहील. सोमवारी जारी केलेल्या एका निवेदनात डब्ल्यूएचओने म्हटले आहे की आम्ही चीनला डेटा आणि प्रवेश सामायिक करण्यासाठी कॉल करत आहोत जेणेकरून आम्हाला COVID-19 चे मूळ समजू शकेल.

भारतातील आरोग्य मंत्रालयही चीनमध्ये श्वसनाच्या आजारांच्या वाढत्या प्रकरणांवर लक्ष ठेवून आहे. चीनमध्ये काय चाललं आहे याच्या माहितीसाठी डब्ल्यूएचओशीही संपर्क साधण्यात आला आहे. शनिवारी आरोग्य सेवा महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

दरम्यान, WHO ने काही आठवड्यांपूर्वी भविष्यात आणखी एक ‘अज्ञात आजार’ म्हणजेच ‘X’ आजारापासून सावध राहण्यास सांगितलं आहे. हे टाळण्यासाठी संपूर्ण जगाने आतापासूनच तयारी सुरू करावी, असा इशारा WHO ने दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

रिक्षाचालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा नियम लागू; …नाहीतर परवाना होणार रद्द!

उर्वशी रौतेलाचा थर्टी फर्स्ट जोरदार; फक्त एक परफॉरमन्स आणि घेतले इतके कोटी रुपये

“हॅलो, मी आईची हत्या केली आहे”; ‘त्या’ एका कॉलमुळे आख्खी मुंबई हादरली

धक्कादायक! ‘आरोपींनी संतोष देशमुख यांचा खून एन्जॉय केला?’, पोलिसांचा गौप्यस्फोट

“अजितदादा क्या हुँआ तेरा वादा…”; आकाच्या आकाची जेलवारी निश्चितच!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now