कोणत्या कारच्या कंपनीला भारतात सर्वाधिक मागणी?, महत्त्वाची आकडेवारी उघड

On: January 3, 2025 12:50 PM
Cars : Hyundai Maruti Suzuki Tata
---Advertisement---

नवी दिल्ली: भारतीय वाहन बाजारासाठी डिसेंबर महिना उत्साहवर्धक ठरला आहे. डिसेंबर महिन्यात सलग तिसऱ्यांदा कार विक्रीत वाढ नोंदवण्यात आली आहे. कारखान्यांमधून डिलरशिपकडे पाठवण्यात येणाऱ्या घाऊक वाहन संख्येत (डिस्पॅच) १० ते १२ टक्क्यांची वाढ झाली असून, हा आकडा २,२५,००० युनिट्सपर्यंत पोहोचला आहे. २०२४ या वर्षात एकूण ४३ लाख वाहने विकली गेली आहेत.

Maruti Suzuki ने मारली बाजी

डिसेंबर २०२३ मध्ये मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) १,०४,७७८ वाहनांची विक्री केली होती, तर डिसेंबर २०२४ मध्ये हा आकडा १,३०,११७ वर पोहोचला. म्हणजेच कंपनीच्या विक्रीत २४.२ टक्क्यांची भरघोस वाढ झाली आहे. या कामगिरीसह मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी हा किताब कायम राखला आहे.

ह्युंदाई आणि टाटा मोटर्समध्ये चुरस

ह्युंदाई मोटर इंडियाने डिसेंबर २०२४ मध्ये ४२,२०८ वाहनांची विक्री केली, जी मागील वर्षीच्या तुलनेत (४२,७५०) किंचित कमी (-१.३%) आहे. तर टाटा मोटर्सने डिसेंबर २०२४ मध्ये ४४,२३० वाहनांची विक्री नोंदवली, जी डिसेंबर २०२३ (४३,४७०) पेक्षा २ टक्क्यांनी अधिक आहे.

इतर कंपन्यांची कामगिरी

महिंद्रा अँड महिंद्राने डिसेंबर २०२४ मध्ये ४१,४२४ वाहनांची विक्री केली, जी मागील वर्षीच्या (३५,१७१) तुलनेत १८ टक्क्यांनी जास्त आहे. टोयोटा किर्लोस्करने २४,८८७ वाहनांची विक्री करत १६.५ टक्क्यांची वाढ नोंदवली. एमजी मोटरने ७,५१६ वाहनांची विक्री करून ५५ टक्क्यांची लक्षणीय वाढ साध्य केली. तर निसानच्या विक्रीत किरकोळ घट (-१.५%) झाली असून, कंपनीने डिसेंबर २०२४ मध्ये २,११८ वाहनांची विक्री केली.

२०२४ मध्ये वाहन बाजाराची उज्वल कामगिरी

२०२४ मध्ये भारतीय वाहन बाजाराने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एकूण ४३ लाख वाहने रस्त्यावर आली आहेत, जी भारतीय वाहन उद्योगासाठी एक सकारात्मक बाब आहे.

ग्राहकांच्या पसंतीचा कल

या आकडेवारीवरून ग्राहकांचा सर्वाधिक कल मारुती सुझुकीच्या कारकडे असल्याचे स्पष्ट होते. तसेच, टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा देखील ग्राहकांच्या पसंतीस उतरत असल्याचे दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

वाल्मिक कराडने केली सर्वात मोठी मोगणी!

लाडकी बहीण योजनेत मोठा बदल, घरात ही गोष्ट असेल तर मिळणार नाही लाभ

आज छगन भुजबळ-शरद पवार एकत्र येणार; यामागचं कारण काय?

वाल्मिक कराड शरण आला ‘त्या’ गाडीबाबत धक्कादायक दावा समोर!

नववर्षात ग्राहकांना झटका, सोन्याची पुन्हा मोठी भरारी; बघा आजचे लेटेस्ट दर

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now