वजन कमी करायचं आहे? तर ‘हा’ फार्मुला नक्की वापरा!

On: May 3, 2025 12:37 PM
Weight Loss
---Advertisement---

Weight Loss Tips | आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना वाढत्या वजनाची समस्या भेडसावत आहे. यावर उपाय म्हणून व्यायाम, आहार नियंत्रण, उपवास आदी पर्याय वापरले जातात. यामध्येच सध्या ‘6-6-6 वॉकिंग फॉर्म्युला’ नावाचा एक नवा आणि लोकप्रिय ट्रेंड सोशल मीडियावर आणि फिटनेस वर्तुळात पाहायला मिळत आहे. तो वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. (Weight Loss Tips)

विशेष म्हणजे हा फॉर्म्युला कामाच्या गडबडीत व्यायामासाठी वेळ न मिळणाऱ्या लोकांसाठी सोपा आणि प्रभावी पर्याय आहे. यात केवळ चालण्याच्या सहाय्याने शरीर तंदुरुस्त ठेवण्यावर भर दिला जातो.

नेमकं काय आहे 6-6-6 वॉकिंग फॉर्म्युला? :

6-6-6 वॉकिंग फॉर्म्युलानुसार, दररोज 6 मिनिटे वॉर्म अप, 60 मिनिटे वॉकिंग आणि नंतर 6 मिनिटे शरीर शांत करण्याची प्रक्रिया (cool down) केली जाते. यामुळे शरीर कॅलरी बर्न करते, रक्ताभिसरण सुधारते आणि मन प्रसन्न राहते.

या 60 मिनिटांच्या चालण्याचा कालावधी तुम्ही दोन वेळा 30-30 मिनिटांमध्येही विभागू शकता. वॉर्म अपमध्ये हलकं स्ट्रेचिंग किंवा जॉगिंग करता येते, तर थंड करण्यासाठी प्राणायाम किंवा ध्यानाचा वापर करता येतो. (Weight Loss Tips)

Weight Loss Tips | ‘6-6-6’ वॉकिंगचे फायदे :

– दररोज 60 मिनिटे चालल्याने शरीरातील अतिरिक्त कॅलरी जळतात आणि फॅटचा स्तर कमी होतो. त्यामुळे वजन हळूहळू घटू लागते.

– नियमित चालल्यामुळे कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो, जे हृदयासाठी फायदेशीर ठरते.

– चालण्यामुळे एंडोर्फिन नावाचे आनंददायक हार्मोन स्रवतात, जे मानसिक तणाव दूर करण्यास मदत करतात.

– वॉर्म अपमुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते आणि चालल्यामुळे शरीर दिवसभर उर्जेने भरलेले राहते.

News Title: What is the 6-6-6 Walking Formula for Weight Loss? Know the Benefits and How to Follow It

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now