सातारा गॅझेटियर म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर

On: September 3, 2025 3:50 PM
Maratha Reservation
---Advertisement---

what is satara gazetteer | सातारा गॅझेटियर हा ब्रिटिश काळातील (सुमारे 1820–1830) एक महत्त्वाचा सरकारी दस्तऐवज आहे. त्या काळात ब्रिटिशांनी महसूल वसुली, जमिनींची नोंदणी, शेतीचे प्रकार, लोकसंख्या, जाती, कुळ, धर्म आणि सामाजिक रचनेची तपशीलवार माहिती गोळा करून गावनिहाय लेखाजोखा तयार केला होता. हा लेखाजोखा म्हणजेच गॅझेटियर.

यामध्ये सातारा जिल्ह्यातील अनेक गावांबाबत कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी अशा उल्लेख आढळतात. यावरून मराठा समाज आणि कुणबी समाज यांच्यातील संबंध स्पष्ट होतो. (what is satara gazetteer)

मराठा आरक्षणासाठी याचे महत्त्व :

आजच्या काळात सातारा गॅझेटियरचे महत्त्व केवळ ऐतिहासिक नाही, तर सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून फार मोठे आहे.

कुणबी नोंदीचा पुरावा – कुणबी समाजाला आधीच ओबीसी आरक्षण मिळालेले आहे. गॅझेटियरमध्ये “मराठा-कुणबी” असा उल्लेख असल्याने मराठा समाजालाही कुणबी समाजाशी नाते जोडता येते. (what is satara gazetteer)

ऐतिहासिक दस्तऐवजाची ताकद – न्यायालयीन लढाई किंवा सरकारी आरक्षण प्रक्रियेत ऐतिहासिक पुरावे महत्त्वाचे मानले जातात. सातारा गॅझेटियर त्या दृष्टीने मजबूत आधार पुरवतो.

सरकारी संकेतस्थळावर नोंदी – सातारा जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर तालुकावार “कुणबी- मराठा” नोंदी उपलब्ध आहेत. याचा वापर करून प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

what is satara gazetteer | उपयोग कसा होतो? :

ब्रिटिशांच्या काळात हा दस्तऐवज महसूल प्रशासनासाठी वापरला जात होता.

आत्ताच्या काळात तो मराठा समाजाचा कुणबी समाजाशी संबंध दाखवण्यासाठी आणि आरक्षण प्रक्रियेत पुरावा म्हणून वापरला जातो.

यामुळे सरकारकडे अर्ज करून ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी पात्रता सिद्ध करता येते.

News title : what is satara gazetteer

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now