Hyderabad Gazette | हैद्राबाद गॅझेट हा १८८४ साली निजामशाही सरकारकडून प्रकाशित केलेला अधिकृत अहवाल आहे. या गॅझेटमध्ये १८८१ च्या जनगणनेवर आधारित माहिती नोंदवली गेली होती. त्यावेळी हैद्राबाद राज्यात असलेला औरंगाबाद (सध्याचा छत्रपती संभाजीनगर) जिल्हा, त्यातील वैजापूर आणि इतर तालुके यामध्ये विविध जाती-समुदायांची लोकसंख्या नमूद करण्यात आली होती. (Hyderabad Gazette)
यात कुणबी समाजाची लोकसंख्या वैजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात असल्याचा उल्लेख आहे. मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाचे नेते असे म्हणतात की, मराठा समाज आणि कुणबी समाज यांचे ऐतिहासिक नातं आहे. त्यामुळे मराठ्यांना कुणबी समाजाशी जोडून ओबीसी आरक्षण मिळावे, यासाठी हे गॅझेट ते ऐतिहासिक पुरावा म्हणून मांडत आहेत.
कोणत्या जातींचा समावेश आहे? :
हैद्राबाद गॅझेटमध्ये मुख्यत्वे त्या काळच्या ग्रामीण व कृषीप्रधान समाजांचे तपशीलवार नोंदी आहेत. विशेषतः –
कुणबी समाज – वैजापूरसह औरंगाबाद जिल्ह्यात या समाजाची मोठी संख्या नोंदवली आहे.
इतर कृषी व्यवसायाशी निगडीत जाती – गॅझेटमध्ये जनगणनेत मोजलेल्या शेतकरी, शेतमजूर, तसेच शेताशी संबंधित इतर समुदायांचा उल्लेख आहे.
गॅझेटमधील आकडेवारीनुसार, कुणबी समाजाची लोकसंख्या ठळकपणे अधोरेखित होते आणि याचाच आधार मराठा समाज ओबीसी आरक्षणाच्या दाव्यासाठी घेत आहे.
Hyderabad Gazette | महत्व का आहे? :
– हे गॅझेट २००६ मध्ये महाराष्ट्र शासनाने पुन्हा प्रकाशित केले होते.
– मराठा समाजासाठी हे ऐतिहासिक व सामाजिक पुरावा मानले जाते.






