Weight loss mantra | बदलत्या जीवनशैलीसोबत अनेक आजारही अधिक वाढले आहेत. पौष्टिक आहाराऐवजी फास्ट फूड खाण्यावर अधिक भर दिला जातो. त्यातच बरेच व्यक्ती हे ऑफिसमध्ये काम करत असल्याने त्यांना साधारण 8 ते 9 तास बसूनच काम करावे लागते. यामुळे शरीराची हालचाल होत नाही आणि वजन वाढते. याचसोबत अनेक आजारही वाढतात. बऱ्याच जणांना कामाच्या शिफ्टमुळे व्यायाम करणे देखील जमत नाही. मग, अशावेळी आपण व्यायाम नाही तर चालू देखील शकतो.(Weight loss mantra)
वजन कमी करण्याचा मंत्रा-
फक्त चालण्याने देखील अनेक फायदे मिळतात. आता प्रश्न पडतो की, नेमकं किती वेळ चालायला हवे, किंवा किती किलोमीटर चालणे गरजेचे आहे. यामुळे आपल्या शरीरातील किती कॅलरिज बर्न होतात? या सगळ्या प्रश्नाचे उत्तर या लेखात दिले आहे. वजन कमी करायचे असेल तर हा लेख नक्की पूर्ण वाचा.
दररोज आणि नियमित चालल्याने हृदयाचे आरोग्य आणि अनेक आजारांपासून आपला बचाव होतो, असं तज्ञ म्हणतात. त्यातच एक किलोमीटर चालल्याने नेमक्या किती कॅलरीज बर्न होतात असा प्रश्न नेहमीच पडत असतो.(Weight loss mantra)
काही आरोग्य तज्ञानुसार कॅलरीज बर्न होणे हे तुमच्या वजनावर अवलंबून असते. जर तुमचं वजन जास्त असेल तर जास्त कॅलरीज बर्न होतात. याचबरोबर किती आणि कोणत्या वेगाने तुम्ही चालत आहात यावरही कॅलरीज बर्न होण्याचं प्रमाण ठरतं.
1 किलोमीटर चालल्याने किती कॅलरिज बर्न होतात?
समजा जर तुमचं वजन हे 90 kg असेल आणि तुम्ही एक किलोमीटर चालत असाल तर तुमच्या 80 ते 100 कॅलरीज बर्न होऊ शकतात. तसेच तुमचे वजन जर 70 किलो किंवा त्याच्या जवळपास असेल तर एक किलोमीटर चालल्याने तुम्ही साधारण 60 ते 75 कॅलरीज बर्न करू शकता. अशाप्रकारे फक्त तुम्ही चालूनच तुमचे वजन कमी करू शकता. पण चालण्याबरोबरच पौष्टिक आहार तसेच थोडाफार व्यायामही गरजेचा असतो. (Weight loss mantra)
News Title – Weight loss mantra burned calories by walking
महत्त्वाच्या बातम्या-
“राजे माफ करा..”; शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेनंतर रितेश देशमुखची पोस्ट
पुढील 48 तास धोक्याचे, IMD कडून ‘या’ जिल्ह्यांना हायअलर्ट
दहीहंडीला मिळाली आनंदवार्ता! सोन्याचे भाव घसरले, जाणून घ्या आजचे दर
BCCI चं ऐतिहासिक पाऊल, क्रिकेटपटूंसाठी जय शाह यांची सर्वात मोठी घोषणा!
“आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतोच कसा?”; मालवण घटनेने राज ठाकरेंचा संताप






