‘असा’ मेसेज आला तर सावध व्हा, अन्यथा अडकाल मोठ्या संकटात!

On: October 31, 2025 4:11 PM
Scam
---Advertisement---

Cyber Crime | राजस्थानच्या (Rajasthan) भीलवाडा (Bhilwara) शहरातून सायबर फसवणुकीचा एक नवीन आणि अत्यंत धोकादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका ‘महिला मंडळ’ व्हॉट्सॲप ग्रुपवर (WhatsApp Group) पाठवलेल्या लग्नाच्या पत्रिकेच्या लिंकने खळबळ उडवून दिली. या लिंकवर क्लिक करताच अनेक महिलांचे फोन हॅक झाले.

मैत्रिणीकडून आलेली लिंक ठरली घातक :

भीलवाडा (Bhilwara) येथील एका ‘महिला मंडळ’ व्हॉट्सॲप ग्रुपला (WhatsApp Group) सायबर चोरांनी लक्ष्य केले. या ग्रुपमध्ये १५० हून अधिक महिला सदस्य आहेत. १६ ऑक्टोबर रोजी, एका सदस्याला तिच्याच मैत्रिणीच्या नंबरवरून एका लग्नपत्रिकेची लिंक प्राप्त झाली. ओळखीच्या नंबरवरून आल्याने तिने त्यावर क्लिक केले.

क्लिक करताच त्या महिलेचे व्हॉट्सॲप (WhatsApp) ॲप आपोआप अनइन्स्टॉल झाले. त्यानंतर मध्यरात्री ३ वाजता आलेल्या एका कॉलने तिचा फोन पूर्णपणे हँग झाला. सकाळी तपासले असता, ‘फोन पे’ (PhonePe) ॲप हॅक झाल्याचे आणि एसबीआय (SBI) खात्यातून पैसे काढण्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्याचे उघड झाले. बँकेच्या सुरक्षा यंत्रणेमुळे तिचे पैसे वाचले.

Cyber Crime | ‘APK’ फाईलचा धोकादायक ट्रॅप :

याच ग्रुपमधील रीना जैन (Reena Jain) नावाच्या सदस्यानेही ही लिंक पाहिली, पण त्यांनी क्लिक करण्यापूर्वीच ग्रुपवर ‘लिंक बनावट आहे, कोणीही उघडू नये’ असा इशारा आल्याने त्या वाचल्या. मात्र, ललिता खमेसरा (Lalita Khamesra) यांनी लिंकवर क्लिक केले, ज्यामुळे त्यांचे व्हॉट्सॲप (WhatsApp) रिमूव्ह झाले आणि फोन हँग झाला.

तपासात असे दिसून आले की, ही लिंक साधी PDF किंवा इमेज नव्हती, तर ती एक ‘एपीके’ (APK) फाईल होती. अशी फाईल मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल करते, ज्यामुळे सायबर गुन्हेगारांना फोनचा संपूर्ण ताबा मिळतो. अशोक जैन (Ashok Jain) नावाच्या व्यक्तीनेही अशी लिंक वेळीच थांबवून डिलीट केली. या गंभीर प्रकाराची माहिती सायबर सेलला (Cyber Cell) देण्यात आली असून, तज्ज्ञांनी अनोळखी लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन केले आहे.

News title : Wedding Invite Link Hacks WhatsApp Group

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now