Weather Update | हुडहुडी वाढणार!, महाराष्ट्राच्या ‘या’ भागाला हवामान खात्याचा इशारा

On: December 11, 2023 2:49 PM
Weather Update
---Advertisement---

Weather Update | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. ऐन हिवाळ्यामध्ये काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी थंडी सुरु झाली होती. मात्र, आता राज्याच्या अनेक भागात पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र पहायला मिळत आहे. तर काही भागात आता थंडीने डोकं वर काढलं आहे.

राज्यात काही ठिकाणी थंडीची लाट-

पावासानंतर आता महाराष्ट्रातील काही भागात थंडीची (Weather Update) लाट आल्याचं पहायला मिळत आहे. नोव्हेंबर महिन्यात पडलेल्या पावासानंतर आता हळुहळु थंडीची चाहूल लागली आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

हवामान विभागाकडून मिळालेली माहिती-

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, (Weather Update) मुंबईतल्या किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे रात्रीचे तापमान 18 ते 19 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येईल. त्यामुळे रात्री मुंबईकरांना थंडीची मजा घेता येणार आहे. अलिकडे मुंबईच्या प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्याचा परिणाम मुंबईतील नागरिकांच्या प्रकृतीवर होऊ लागला आहे.

Weather Update- पुढे काय माहिती मिळाली?

दरम्यान, वाढत्या प्रदुषणामुळे मुंबईकरांना उष्माचाही रोज सामना करावा लागतो. मुंबईकर सध्या थंडीची वाट पहात आहेत. प्रादेशिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार 12, 13 आणि 14 डिसेंबर रोजी रात्रीचे तापमान 20 अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. तर 15 आणि 16 डिसेंबरला तापमान 19 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. हवामान खात्याने पुढे सांगितलं की, उत्तरेकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह अधिक मजबूत होईल, त्यामुळे रात्रीचे तापमान कमी होईल.

News Title : weather update winter increases in state

थोडक्यात बातम्या-

Article 370 | सर्वात मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

SIP मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

Dengue | काळजी घ्या! राज्यातून अत्यंत चिंताजनक माहिती समोर

Vidyut Jamwal | ‘या’ अभिनेत्याने शेअर केले जंगलातील न्यूड फोटो!

Maratha Reservation | ‘…तर मी आमदारकीचा राजीनामा देईन’; ‘या’ आमदाराची मोठी घोषणा

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now