Weather Update | रविवारी मुंबईत मुसळधार पाऊस झाला. एकाच दिवसात इथे तब्बल 300 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे मुंबईची तुंबई झाली. यामुळे बऱ्याच भागात पाणी साचलं होतं. नागरिकांना देखील यामुळे बराच त्रास सहन करावा लागला. अशात राज्यात आज (11 जुलै) देखील काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुढील तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र भागात मुसळधार पावसाचा (Weather Update) अंदाज आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या सहा जिल्ह्यांना आजपासून 14 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट दिला आहे.
‘या’ ठिकाणी यलो आणि ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने मुंबई आणि ठाणेला चार दिवस यलो अलर्ट दिला आहे. तसेच येथील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. या ठिकाणी दमदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या सर्वच जिल्ह्यात मॉन्सून सक्रिय झाला (Weather Update) आहे. पावसामुळे मुंबईसह उपनगरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. भातसा धरण क्षेत्रात अद्यापपर्यत 968.00 मि.मी असा चांगला पाऊस झाला. यामुळे धरणाची पाणी पातळी 115.06 मीटर इतकी वाढली आहे.
शेतकऱ्यांनी उरकली पेरणीची कामे
मात्र, या मुसळधार पावसाने बऱ्याच ठिकाणी शेतीचे मोठं नुकसान झालं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 17 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने जवळपास 11 हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान झालं (Weather Update)आहे. दुसरीकडे ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला. तिथे पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत.
दरम्यान, हवामान विभागाने अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळसाठी 11 ते 14 जुलै दरम्यान येलो अलर्ट जारी केला आहे.
News Title – Weather Update today 11 july
महत्त्वाच्या बातम्या-
आज ‘या’ राशीच्या व्यक्तींना आर्थिक तोटा होण्याची संभावना!
पुण्यात ड्रोनच्या घिरट्या थांबायचं नाव घेईनात; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
ऐकावं ते नवलंच! पीएम आवास योजनेचे पैसे मिळताच 11 महिला बॉयफ्रेंडसोबत झाल्या फरार, पती मात्र..
सावधान! पुढील तीन दिवस ‘या’ भागात दमदार पाऊस पडण्याची शक्यता
मोठी बातमी! ठाण्यात स्वाईन फ्ल्यूचा शिरकाव, रूग्णांची संख्या आली समोर






