Weather Update | थंडी वाढणार, हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

On: January 16, 2024 12:16 PM
Weather Update
---Advertisement---

Weather Update | राज्यात गेले काही दिवस तापमान बदल होत असतानाचा चित्र पाहायला मिळत आहे. तसेच दिवसेंदिवस थंडी वाढत चाललीये. दरम्यान पुढील दोन दिवस थंडी राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यात आणखी तीन दिवस थंडी राहणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने (Weather Update) व्यक्त केला आहे.

राज्यात थंडी वाढणार?

हवामान विभागानं (Weather Update) वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे. तसेच पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात हवामान कोरडे राहणार आहे. तर पुढील 24 तासात पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे.

ज्यामुळं किमान तापमानात घट नोंदवली जाणार आहे. किमान तापमानाचा आकडा सरासरी 12 ते 14 अंशांच्या घरात राहणार असून, डोंगराळ परिसरामध्ये हा आकडा आणखी कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

Weather Update | हवामान विभागाचा इशारा

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईसह उपनगरात तसेच राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे. मुंबईत पारा तब्बल 4 अंश सेल्सियसने घसरला आहे. धुक्यामुळे प्रदूषणातही वाढ झाली आहे. आधीच थंडी त्यात प्रदूषण यामुळे दवाखाने, रुग्णालयांच्या ओपीडीत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे

देशातील दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबसह जम्मू-काश्मीरमध्येही तापमानात मोठी घट झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस तापमानात आणखी घट होणार आहे.

दरम्यान, धुक्यामुळे प्रदूषणातही वाढ झाली आहे. आधीच थंडी त्यात प्रदूषण यामुळे दवाखाने, रुग्णालयांच्या ओपीडीत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. घसा खवखवणे, सर्दी, खोकला अशा तक्रारी घेऊन रुग्ण रुग्णालयात गर्दी होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

PM Ujjwala Yojana Online Apply 2024 l घरबसल्या मोफत गॅस सिलिंडरचा लाभ घेण्यासाठी अशाप्रकारे करा अर्ज

Woman Mental Health Tips l महिलांनी आताच व्हा सावध, ही लक्षणं असतील तर तुमची मानसिक स्थिती नाही बरोबर!

Reliance, TCS सह ‘या’ 5 शेअर्सची छप्परफाड कमाई, एका आठवड्यात कमावले तब्बल 2 लाख कोटी!

Inflation l अबब! 400 रुपयांमध्ये मिळतायेत फक्त 12 अंडी, अन् 250 रुपये किलो झाला कांदा

Eye Care Tips lअशी घ्या डोळ्यांची काळजी, चाळीशीनंतरही लागणार नाही चष्मा!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now