Weather Update | ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

On: January 1, 2024 3:39 PM
Weather Update
---Advertisement---

Weather Update | नवीन वर्षांच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्रात पाऊस कोसळणार आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे. आधीच अवकाळी पावसाने पिकांचं नुकसान केलं आहे. आता पुन्हा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाने (Weather Update) व्यक्त केला आहे.

Weather Update | ‘या’ भागात पावसाची शक्यता

पुणे परिसर आणि कोकणात बुधवारपासून पावसाचा अंदाज आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्याचा परिणामामुळे हा पाऊस पडणार आहे. मध्य महाराष्ट्रात गुरुवारपासून पावसाचे सावट असणार आहे.

महाराष्ट्रात मराठवाडा वगळता कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Weather Update | हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

मध्य महाराष्ट्रातील 17 तसेच विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात अशा एकूण 22 जिल्ह्यात 1 ते 7 जानेवारी दरम्यानच्या आठवड्यात फक्त काही ठिकाणीच किंचित ढगाळ वातावरण राहू शकतं.

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशासह राज्यातील हवामानावर परिणाम होताना पाहायला मिळणार आहे. देशाच्या उत्तरेकडे थंडीची लाट कायम असून थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. उत्तर भारतात सर्वत्र धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. उत्तरेकडील भागात थंडीत चांगलीच वाढ झाली आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थंडी कायम राहणार आहे.

अनेक राज्यांमध्ये दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. सध्या देशातील बहुतेक भागात कडाक्याची थंडी सुरू आहे. पहाटेच्या धुक्यामुळे लोकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये पुढील दोन दिवस थंडी वाढण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘या’ बड्या खेळाडूचा चाहत्यांना धक्का; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Central government employees | नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात; सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Gold Price Today | वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं; जाणून घ्या आजचे दर

LPG Price Today | नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी गुड न्यूज!

Tom Wilkinson | मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेत्यानं घेतला जगाचा निरोप

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now