Weather Update | हवामान विभागाने आज (21 जून) विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे या भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यासोबतच कोकण, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
काल 20 जूनरोजी ठाणे, पालघर, विरार आणि कल्याण- डोंबिवली परिसरात जोरदार पाऊस झाला. पावसाचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. बऱ्याच जणांचे आर्थिक नुकसान देखील झाले.
आज पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज विदर्भातील अमरावती, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. यासोबतच नांदेड, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि साताऱ्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
‘या’ भागांना पावसाचा ऑरेंज अलर्ट
आठवडाभर विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. मुंबई, पुणे तसेच मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकरी देखील सुखावले आहेत. मॉन्सून देखील पुन्हा सक्रिय झाल्याने आता शेतीची कामे करण्यास सुरुवात झाली आहे.
दुसरीकडे राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह पावसाच्या (Weather Update) सरी कोसळत असल्या तरी काही भागात पुन्हा उकाडा वाढला आहे. गुरुवारी जळगावमध्ये राज्यातील उच्चांकी तापमान 38.7 अंश तापमानाची नोंद झाली.
पुण्यात कसं राहील तापमान?
गेल्या आठवड्यात पुण्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. संपूर्ण शहरात मुसळधार पावसाने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पहिल्याच पावसात पुण्यात (Pune Weather Update ) अनेक ठिकाणी पाणी शिरले होते. आता पुढील तीन दिवस पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
News Title – Weather Update June 21
महत्त्वाच्या बातम्या-
वट सावित्री पौर्णिमा का साजरी करतात? जाणून घ्या यामागचे कारण
सहा वर्षीय बालिकेला अत्याचार करुन संपवलं, संतप्त जमावानी केलं धक्कादायक कृत्य
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर






