Weather Update। नवरात्र झाली, दसरा झाला आणि दिवाळी देखील संपली, तरीही राज्यातील पावसाचा जोर काही कमी झालेला नाही. ऐन दिवाळीच्या काळातही अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. आणि आज सकाळपासून काही ठिकाणी पुन्हा पाऊस सुरू असून आकाशात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला गेला आहे.
हवामान विभागाचा इशारा
पुढील काही दिवस राज्यात पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे. विशेषतः पुढील दोन दिवस पुणे शहर, जिल्हा आणि घाटमाथ्याच्या भागात जोरदार पावसाची शक्यता असून, पुणे वेधशाळेने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामुळे पुणे शहर, जिल्हा आणि घाट विभागासाठी हवामान खात्याने इशारा दिला आहे. तसेच, मुंबई आणि उपनगरांसाठीही पुढील 48 तासांसाठी पाऊस व वादळी वाऱ्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कमी दाब प्रणालीमुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. फक्त पुणेच नाही तर राज्यातील अनेक भागात आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच वादळी वारेही आज पाहायला मिळणार आहे. मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र, या भागात आज मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोणत्या भागात होणार पाऊस?
मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, रायगड, मध्य मध्य महाराष्ट्र, सोलापूर, पुणे, आहिल्यानगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, बीड, लातूर, धाराशिव, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, नांदेड या भागात वादळी वारा आणि पावसाचा अंदाज आहे. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्या निर्माण झाल्या असल्याने या आठवड्याच्या बुधवार पर्यंत कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा- विदर्भ भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
सोमवारी बंगालच्या उपसागरातील तीव्र दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात होईल आणि मंगळवारला ते आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकेल आणि याच परिस्थितीमुळे मराठवाडा आणि विदर्भात पाऊस येण्याची शक्यता आहे. तसेच कोकण किनारपट्टीवर बुधवार ते गुरुवारपर्यंत पावसाची शक्यता.






