Weather Forecast | देशभरात हवामानातील सतत बदल होत असताना, भारतीय हवामान विभागाने (IMD) ईशान्य भारतासाठी पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरावर (Bay of Bengal) चक्री वाऱ्याची स्थिती निर्माण होत असल्याने आसाम (Assam) आणि त्याच्या शेजारील राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
सात दिवस पावसाचा अंदाज-
हवामान विभागाच्या (Weather Forecast) माहितीनुसार, नागालँड (Nagaland) आणि परिसरात समुद्रसपाटीपासून 1.5 किमी उंचीवर चक्री वाऱ्याचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे 15 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत ईशान्य भारतातील अनेक भागांत जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारी 19: आसाम आणि मेघालयमध्ये (Meghalaya) मुसळधार पावसाची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh), नागालँड, मणिपूर (Manipur), मिझोराम (Mizoram), त्रिपुरा (Tripura), उप-हिमालयीन पश्चिम बंगाल (Sub-Himalayan West Bengal) आणि सिक्किममध्ये (Sikkim)
पुढील सात दिवस हलक्या पाऊसाची शक्यता-
शनिवारी अरुणाचल प्रदेशमध्ये हिमवृष्टी (Weather Forecast) आणि पाऊस झाला, तर इतर भागांतही जोरदार पाऊस पडला. उत्तर भारतातील काही भागांतही पाऊस शक्यहवामान विभागाने सांगितले की, नवीन पश्चिमी झंझावात (Western Disturbance) हिमालयीन प्रदेशात सक्रिय होत आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) 19-20 फेब्रुवारी दरम्यान हलका पाऊस आणि हिमवृष्टी होऊ शकते.
राजस्थानमध्ये 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंजाब (Punjab), हरियाणा (Haryana) आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये (Western Uttar Pradesh) 19-20 फेब्रुवारी दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. शनिवारी पंजाबमध्ये काही ठिकाणी पाऊस झाला, ज्यामुळे रब्बी पिकांच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दिल्लीसह उत्तर भारतात तापमानात वाढ
हलक्या धुक्याची शक्यता-
उत्तर भारतातील मैदानी भागांत उष्णतेची लाट जाणवत असून, थंडीचा प्रभाव कमी होत आहे. दिल्ली-एनसीआर (Delhi-NCR), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि बिहारमध्ये (Bihar) दिवसभर कोरडे आणि उन्हाचे वातावरण जाणवत आहे. पश्चिम आणि पूर्व उत्तर प्रदेशात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पहाटे आणि रात्री काही भागांत हलक्या धुक्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.या हवामान बदलांमुळे ईशान्य भारत आणि उत्तर भारतातील नागरिकांना सावधानता बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.






