भारत विरुद्ध पाकिस्तान सेमीफायनल होणार की नाही? चाहते चिंतेत

On: July 30, 2025 11:57 AM
WCL 2025
---Advertisement---

WCL 2025 | वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (WCL) 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांनी सेमीफायनलमध्ये आपलं स्थान पक्कं केलं आहे. पहिला उपांत्य सामना 31 जुलै 2025 रोजी बर्मिंगहॅम येथे खेळवला जाणार आहे. मात्र, हा सामना होणार की नाही, यावर आता मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. (Ind Vs Pak)

२० जुलैचाच मुद्दा पुन्हा पुढे :

२० जुलै रोजी लिग फेरीतील भारत-पाकिस्तान सामना भारतीय खेळाडूंनी खेळण्यास नकार दिल्यामुळे रद्द करण्यात आला होता. यावेळी भारतीय संघाने ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानशी सामना टाळण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता पुन्हा या दोन संघांमध्ये सेमीफायनल ठरल्याने, सामना होईल की पुन्हा एकदा पाकिस्तान फायनलमध्ये सरळ जाईल? – हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

WCL 2025 मध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या शिखर धवनने याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. “मी पूर्वीही पाकिस्तानविरुद्ध खेळलो नाही आणि आताही खेळणार नाही,” असं त्यानं जाहीरपणे सांगितलं आहे. त्यामुळे संघाचा सामूहिक निर्णय नकारात्मक असण्याची शक्यता अधिक आहे. (Ind Vs Pak)

WCL 2025 | WCL आयोजकांचा ‘डॅमेज कंट्रोल’ :

२० जुलैच्या प्रसंगानंतर WCL च्या आयोजकांनी भारतीय चाहत्यांची आणि खेळाडूंची माफी मागितली होती. त्यांनी स्पष्ट केलं की, भारत-पाक सामन्याची योजना केवळ क्रिकेटप्रेमाला चालना देण्यासाठी होती. परंतु त्यांनी काहींच्या भावना दुखावल्याची कबुलीही दिली होती.

दरम्यान, WCL प्रशासन भारत-पाकिस्तानचा सेमीफायनल टाळण्याच्या तयारीत आहे. त्याऐवजी, भारत-ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान-दक्षिण आफ्रिका असे क्रॉस सेमीफायनल्स होण्याची शक्यता आहे. मात्र, अशात दोन्ही संघ फायनलमध्ये पोहोचल्यास पुन्हा एकदा तोच पेच उभा राहील.

News Title: WCL 2025 India vs Pakistan Semi-Final Doubtful – Will India Forfeit Match Again?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now