केरळमधील भूस्खलनग्रस्तांसाठी साऊथ अभिनेत्याचा पुढाकार; दिले लाखोंचे योगदान

On: August 5, 2024 12:27 PM
Wayanad Landslide Allu Arjun donated 25 lakhs
---Advertisement---

Wayanad Landslide | केरळमध्ये पावसाने नुसताच धुमाकूळ घातला आहे. येथील भूस्खलनामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. या नैसर्गित आपत्तीमुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. आता पर्यंत 308 जणांचा यात मृत्यू झाला आहे. तर, अजून शेकडो लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. केरळमधील भूस्खलनग्रस्तांसाठी (Wayanad Landslide) साऊथ कलाकारांनी पुढाकार घेतला आहे.

साउथ स्टार्स नयनतारा, तिचा पती विघ्नेश शिवन, मोहनलाल यांनी आपत्तीग्रस्तांसाठी लाखो रुपयांची देणगी दिली होती. आता स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन देखील पुढे आला आहे. त्याने आपत्तीग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अल्लू अर्जुनने 25 लाखांची मदत करत आपले योगदान दिले आहे.

अभिनेता अल्लू अर्जुनने केली 25 लाखांची मदत

त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून भूस्खलनाच्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. “वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनामुळे मला खूप दु:ख झालं आहे. केरळने मला नेहमीच खूप प्रेम दिलं आहे. मला 25 लाख रुपये केरळच्या सीएम रिलीफ फंडात पुनर्निर्माणासाठी दान करून योगदान द्यायचं आहे. तुमच्या सुरक्षिततेसाठी आणि सामर्थ्यासाठी प्रार्थना.”, अशी पोस्ट अल्लू अर्जुनने केली आहे.

यासोबतच साऊथ स्टार मोहनलालनेही तीन कोटींची (Wayanad Landslide) मदत केली होती. तसेच अभिनेत्री नयनतारा आणि तिचा पती विघ्नेश शिवन यांनी मदत निधीसाठी 20 लाख रुपयांची देणगी दिली होती. यानंतर अभिनेता अल्लू अर्जुनने आपले योगदान दिले.

साऊथ स्टार मोहनलालकडून 3 कोटींची मदत

केरळमध्ये 30 जुलै रोजी चुरलमला आणि मुंडक्काई येथे भूस्खलन झालं. यामध्ये बऱ्याच जणांनी आपला जीव गमावला आहे. या घटनेमुळे देशभर खळबळ उडाली. केरळमध्ये निसर्ग अक्षरश: कोपला आहे. इतर राज्यांनी देखील केरळला मदतीचा हात पुढे केला आहे.

सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांनी 2 कोटी रुपये आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी 5 कोटी रुपयांच्या मदतीचे आश्वासन दिले आहे.तर, कॉँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी (Wayanad Landslide) भेट देऊन सर्व परिस्थितीची पाहणी केली.तसेच त्यांनी हा मुद्दा संसदेत देखील उपस्थित केला.

News Title : Wayanad Landslide Allu Arjun donated 25 lakhs

महत्त्वाच्या बातम्या-

नागरिकांनो ‘या’ मेसेजपासून सावध राहा; अन्यथा बँक खात होऊ शकत रिकामं

“शरद पवारांनी महाराष्ट्राचं मणिपूर करायला हातभार..”; राज ठाकरेंचा हल्लाबोल

अलर्ट! येत्या काही तासात ‘या’ जिल्ह्यांत वाढणार पावसाचा जोर

12 पैकी ‘या’ 2 राशींवर महादेवाची कृपा राहणार

“नारायण राणेंनी मला फुकट धमक्या देऊ नयेत, नाहीतर..”; जरांगे पाटील यांचा थेट इशारा

Join WhatsApp Group

Join Now