Pune News l पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे पाण्याची टाकी कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता पिंपरी चिंचवड येथे खळबळ उडाली आहे. मात्र आता या घटनेमुळे नागरिक देखील प्रचंड संतापले आहेत.
भोसरीमध्ये घडली दुर्दैवी घटना :
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, आज सकाळच्या सुमारास पिंपरी चिंचवडमधील भोसरी येथील सद्गुरू नगरमध्ये अचानकपणे एक पाण्याची टाकी कोसळली. मात्र या दरम्यान टाकीच्या ढीगाऱ्याखाली अनेकजण अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या घटनेत तीन नागरिकांचा मृत्यू देखील झाला आहे.
या धक्कादायक घटनेनंतर अग्निशमन दल, बचाव पथक व अँब्युलन्सने ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली आणि तत्काळ बचावकार्य करत जखमींना उपचारांसाठी रूग्णालयात देखील दाखल केले आहे. याशिवाय या घटनेत पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर याठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
Pune News l नागरिकांनी केला मोठा खुलासा :
आता पाण्याची टाकी नेमक्या कोणत्या कारणामुळे कोसळली या घटनेचा प्रशासनाकडून तपास सुरू केला जात आहे. याशिवाय दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. तसेच भोसरी येथील सद्गुरू नगरमध्ये असलेल्या इतर कामगारांनी आणि प्रत्यक्षदर्शींंनी ही पाण्याची टाकी नुकतीच बांधली असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय या टाकीमध्ये पाणी भरल्याने ही टाकी कोसळून दुर्घटना झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.
मात्र या दुर्दैवी दुर्घटनेत तीन मजूर जागीच ठार झाले असून यामध्ये सात ते आठ जण जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच आता या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
News Title : Water Tank Collapsed in Bhosari
महत्वाच्या बातम्या –
AB फॉर्म म्हणजे नेमकं असतं तरी काय?, निवडणुकीत याला इतकं महत्व का?
‘या’ मतदारसंघात होणार शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना; पाहा कुणाचं पारडं भारी?
आज गुरुपुष्यामृत योग ‘या’ राशींसाठी ठरणार भाग्याचा, मिळणार भरपूर यश!
महायुतीत दोस्तीत-कुस्ती?; भाजप नेत्याने शिवसेनेचं टेंशन वाढवलं






