Pune News | पुण्यातील वानवडी (Wanawadi) येथील जगताप चौक (Jagtap Chowk) येथे शनिवारी रात्री वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या मुलीने रस्त्यावर गोंधळ घातला. मद्यधुंद अवस्थेत तिने रस्त्यावर बसून मोठ्याने आरडाओरड केली, ज्यामुळे वाहतूक कोंडी झाली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड गर्दी जमली, आणि नागरिकांनी तक्रार करत पोलिसांना माहिती दिली.
रस्त्यावर गोंधळ आणि वाहतूक कोंडी
स्थानिक नागरिकांनी सांगितल्यानुसार, शनिवारी मध्यरात्री ही महिला (Wanawadi) रस्त्यावर बसून जोरजोरात आरडाओरड करत होती. तिच्या अश्लील वर्तनामुळे नागरिकांना त्रास झाला, आणि वाहतूक विस्कळीत झाली. काही स्थानिकांनी पोलिसांना माहिती देऊन परिस्थिती नियंत्रित करण्याची मागणी केली.
पोलिसांनी काय कारवाई केली?
वानवडी पोलीस ठाण्यात (Wanawadi Police Station) एका प्रत्यक्षदर्शींनी तक्रार नोंदवली. अधिकृत माहितीनुसार, ही महिला पुण्यात कार्यरत असलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची मुलगी आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ती नियमित मद्यपान करते आणि यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत.
Pune Video: Drunken Woman Creates Ruckus At Jagtap Chowk in Wanawadi.#Pune #PuneNews #Wanawadi #drinking pic.twitter.com/wEsaa0BIr9
— Free Press Journal (@fpjindia) February 15, 2025
यापूर्वीही वानवडी परिसरात गोंधळ
ही पहिलीच घटना नाही. 31 डिसेंबर 2023 च्या रात्री, तिने वानवडीतील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये प्रवेश करून गोंधळ घातला होता. सोसायटीच्या सुरक्षारक्षकासोबत झगडा करत त्याला ढकलून दिले. सोसायटीमधून एक टेबल उचलून मुख्य गेटसमोर रस्त्यावर फेकले, ज्यामुळे वाहतूक कोंडी झाली.
सोसायटीच्या गेटसमोर सुरक्षा रक्षकाच्या खुर्च्या ढकलून दार जबरदस्तीने बंद केले. पोलिसांनी नियंत्रण कसे मिळवले?
या घटनेची माहिती मिळताच, कंट्रोल रूमला (Control Room) कॉल करण्यात आला आणि पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या सततच्या वागण्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कुटुंबावर टीका होत असून, पुणे पोलिसांकडून पुढील कारवाईची मागणी होत आहे.






