वाल्मिक कराडवर मकोका लागताच परळीत तणावपूर्ण शांतता, आता पुढील कारवाई काय?

On: January 15, 2025 9:23 AM
Walmik Karad will appear in cage court today 
---Advertisement---

Walmik Karad | बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. बीडमधील आवादा कंपनीला 2 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी सीआयडीच्या ताब्यात असलेल्या वाल्मिक कराडला मंगळवारी (14 जानेवारी) मोठा धक्का बसला. सरपंच हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा ठपका ठेवत कराडवर (Walmik Karad ) काल मकोका ( MACOCA ) लावण्यात आला.

यानंतर परळीत मोठा राडा पाहायला मिळाला. कराड समर्थकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. आधी एका महिलेने आणि एका कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतले. त्यानंतर आणखी एका समर्थकाने स्वत:ला पेटवून घेतले. त्यात त्याचा पाय भाजला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वाल्मिक कराडला आज केज कोर्टात हजर करणार

मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आज वाल्मिक कराडला (Walmik Karad ) केज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आजही परळीत तणावपूर्ण शांतता पाहावयास मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

काल, 14 जानेवारीला देखील कराडला केज न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते.यावेळी खंडणी प्रकरणात कराडची पोलीस कोठडी न्यायालयाने फेटाळत कराडला न्यायालयीन कोठडी दिली. अशात आज त्याला पुन्हा केज कोर्टात हजर केले जाणार आहे.

कराडवर अखेर मकोका लागलाच

दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणी अखेर वाल्मिक कराडवर (Walmik Karad ) मकोकातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कराडवर मकोका लावावा अशी देशमुख कुटुंबीयांसह सर्वपक्षीय नेत्यांची मागणी होती. अखेर त्याच्यावर मकोका लावण्यात आलाय. यानंतर परळी शहरातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण झाले आहे. आजही कराडला कोर्टात हजर केले जाणार आहे.

News Title :  Walmik Karad will appear in cage court today 

महत्वाच्या बातम्या-

पंतप्रधान मोदी आज मुंबईत, ‘असा’ असणार संपूर्ण दौरा!

किंक्रांत! आज ‘या’ राशींनी राहावे सावध, वाचा बुधवारचे राशीभविष्य

वाल्मिक कराडवर मोक्का लागताच सुरेश धसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

वाल्मिक कराडला लागोपाठ दुसरा मोठा धक्का, कोर्टाने घेतला मोठा निर्णय

“हो, पुरुषांचा प्रायव्हेट पार्ट माझ्यासाठी…”, करीना कपूरच्या ‘त्या’ वक्तव्याने हादरलं होतं बॉलिवूड

Join WhatsApp Group

Join Now