सरेंडर होण्यापूर्वी वाल्मिक कराड कुठे होता? कार्यकर्त्यांनी दिली महत्वाची माहिती

On: December 31, 2024 2:58 PM
Beed Jail Clash
---Advertisement---

Walmik Karad l बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या हत्येप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड हा मास्टरमाइंड असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आता गेल्या 22 दिवसांपासून फरार असलेल्या वाल्मिक कराडने अखेर पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करली आहे.

वाल्मिक कराडने शरणागती पत्करली :

वाल्मिक कराडच्या शरणागतीपूर्वी तो कुठे होता याबाबत अनेक तर्क वितर्क वर्तवले जात होते. मात्र आता वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्मिक कराड हा पुण्यातच होता. गेल्या आठ दिवसांपूर्वी तो राज्याबाहेर असल्याचे सांगितले जात होते, पण आता वाल्मिक कराड हा पुण्यातच असल्याचं त्याच्या कार्यकर्त्यांकडून बोललं जात आहे.

वाल्मिक कराडचे कार्यकर्ते आणि निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, तो पुण्यातच लपून राहिला होता आणि तेथूनच त्याने सोशल मीडियावर सक्रिय राहून आपली बाजू मांडली होती. सीआयडी आणि पोलीस दलाने त्याचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकमध्ये देखील पथके तयार केली होती.

वाल्मिक कराड हा पुण्यातचं होता, कार्यकर्त्यांनी दिली माहिती :

वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तो शरणागती पत्करण्यापूर्वी पुण्यातच होता. त्याच्या समर्थकांनी सीआयडी कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने जमाव केला होता, त्यामुळे पुणे पोलीसांनी तेथे मोठा बंदोबस्त तैनात केला होता. मात्र आता वाल्मिक कराडने शरणागती पत्करल्यानंतर, सीआयडीने त्याची कसून चौकशी सुरू केली आहे आणि त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे.

याशिवाय वाल्मिक कराडचे शेवटचे लोकेशन देखील पुण्यात दाखवले होते. त्यामुळे तो कुठं लपला होता, याचा तपास लागणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच पोलीस शोधत असताना वाल्मिक कराडांनी आधीच शरणागती का पत्करली नाही? याचे उत्तर देताना कार्यकर्त्यांनी सांगितले की, त्यांच्यावरील आरोप खोटे आहेत. कारण या खोट्या आरोपांमुळे ते घाबरले असतील म्हणून पोलिसांसमोर ते आले नसतील असेही कार्यकर्त्यांनी म्हंटले आहे.

News Title : walmik karad where was he before surrender

महत्त्वाच्या बातम्या-

‘धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराड एकाच….’, भाजपा आमदार सुरेश धस यांनी दिली रोखठोक प्रतिक्रिया

सुरेश धस अखेर नरमले, ‘त्या’ वक्तव्याबाबत प्राजक्ता माळीची मागितली माफी

“गुन्हेगार स्वत: सरेंडर होत असेल तर मग पोलीस…”; देशमुखांच्या मुलीचा संतप्त सवाल

मी वाल्मिक कराड, न्यायदेवता देईल ती शिक्षा भोगण्यास तयार; स्वतःच व्हिडीओ शेअर करत पोलिसांना शरण

वाल्मिक कराडचा मोठा गौप्यस्फोट, “म्हणाला फाशीची शिक्षा….”

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now