“…तर ‘अण्णा’ला दोन कोटींची खंडणी”,’त्या’ व्यक्तीकडून वाल्मिक कराड गँगचा ‘गेम ओव्हर’!

On: March 29, 2025 12:44 PM
walmik karad and gang
---Advertisement---

Walmik Karad | सरपंच (Sarpanch) संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणात जयराम चाटे याने केलेल्या कबुलीजबाबात, वाल्मीक कराडने सुदर्शन घुलेला सूड घेण्यास सांगितल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, आवादा एनर्जी कंपनीबाहेर चहा पिणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने दिलेला जबाब आता पोलिसांसाठी अत्यंत निर्णायक ठरत आहे.

आवादा कंपनीबाहेर घडलेला धमकीचा प्रकार

6 डिसेंबर 2024 रोजी दुपारी साडेबारा वाजता सुदर्शन घुले आपल्या एका साथीदारासह आवादा एनर्जी कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर गेला. तेथे पोहोचताच त्याने सुरक्षा रक्षकाला अपशब्द वापरले. त्याच वेळी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी शिवाजी थोपटे घटनास्थळी आले. तेव्हा सुदर्शनने थोपटेंना सांगितले की, तो वाल्मीक कराडचा माणूस असून, कंपनी चालू ठेवायची असल्यास ‘अण्णा’ला (Walmik Karad) दोन कोटींची खंडणी द्यावी लागेल, अशी थेट धमकी दिली.

या सगळ्या प्रसंगाचे साक्षीदार असलेल्या चहा पिणाऱ्या व्यक्तीने पोलीस तपासात महत्वाचा जबाब दिला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, सुदर्शन घुलेचा उद्देश फक्त धमकी देण्यापुरता मर्यादित नव्हता, तर त्यामागे गुन्हेगारी हेतू स्पष्ट दिसून येत आहे. या साक्षीमुळे आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे मिळाले आहेत.

सरपंच देशमुखांना धमकी व अपहरणाचा थरार

याच दरम्यान, सरपंच देशमुख घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कंपनी बंद करू नये, गावातील बेरोजगारांना रोजगार मिळू द्यावा, अशी विनंती सुदर्शन घुलेकडे केली. मात्र त्याच्या उत्तरात सुदर्शनने सरपंचांना ‘तुला बघून घेईन, तुला जिवंत सोडणार नाही’ अशी उघड धमकी दिली होती, असे प्रत्यक्षदर्शीच्या जबाबातून समोर आले आहे.

या प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा सुदर्शन घुलेने स्वत: केला आहे. त्यानुसार, उमरी टोलनाक्याजवळ सरपंचांची गाडी अडवण्यात आली. सुधीर सांगळेने वाहनाच्या काचेला दगड मारून गाडी थांबवली. यानंतर सुदर्शनने डाव्या बाजूचा दरवाजा उघडून सरपंचांना कॉलरने पकडत बाहेर ओढले. जयराम चाटेने चालक शिवराज देशमुख याला कोयत्याने धमकावले आणि संतोष देशमुख यांना मारहाण करत जबरदस्तीने स्कॉर्पिओ गाडीत बसवले. त्या वेळी स्कॉर्पिओ चालवणारा सुदर्शन घुलेच होता, हे त्याने तपास यंत्रणांना सांगितले आहे.

News Title : Walmik karad to give 2 crore for avada company

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now