Walmik Karad | संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील मास्टरमाईंड असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) फरार होता. राज्याच्या राजकारणात कराडच यामध्ये मुख्य आरोपी असल्याचं बोललं जात होतं. दरम्यान, फरार वाल्मिक कराडला शोधण्यासाठी मागील काही दिवस पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला होता.
दरम्यान, या प्रकरणाला 22 दिवस उलटून सुद्धा कराडला अटक करण्यात आलेली नव्हती, त्यामुळे वातावरण तापलं असताना स्वतः वाल्मिक कराड पुणे येथे सीआयडी समोर शरण आला. मात्र, त्यामगचं कारण काय आहे?, याबद्दलचा मोठा खुलासा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
नेमकं काय घडलं?
आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडची (Walmik Karad) मालमत्ता जप्त करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितलं की वाल्मिक कराडसारख्या आरोपींना राजकीय संरक्षण मिळत असेल तर, त्यांच्या मालमत्तेवर टाच आणणे आवश्यक आहे. सुरेश धस यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे आणि त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, असं देखील म्हटलं आहे.
माध्यमांशी बोलत असताना धस म्हणाले की, वाल्मिक कराड (Walmik Karad) हा काही स्वखूशीने शरण आला नाही. तर, त्याची मालमत्ता जप्त करण्यात येणार होती. त्याच्या पत्नीला चौकशीला घेऊन येणार होते. तर त्याची बँक खाती गोठवण्यात आली होती. त्यामुळे तो सीआयडीकडे शरण आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणात जातीने लक्ष घातले. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी ॲक्शन घेतल्यानंतर आका शरण आल्याचा दावा धसांनी केला.
302 कलमातंर्गत गुन्हा-
वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतर, सुरेश धस यांनी एक मोठं भाकित केलं आहे. त्यांनी सांगितलं की जर वाल्मिक कराडचा व्हिडिओ ‘आका’ने (शरद पवार) पाहिला असेल तर त्यांना हे समजेल की या प्रकरणात किती गंभीरता आहे. सुरेश धस यांनी या प्रकरणातील आरोपींवर 302 कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे आणि त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी, असं म्हटलं आहे.
News Title : Walmik Karad surrenders-suresh-dhas-demands-property-seizure
महत्त्वाच्या बातम्या-
‘दाते पंचांग बघून…’; कराडच्या शरणागतीवर अंजली दमानियांना संशय
“राजीनामा काय आता चिखलफेकही सहन केली जाणार नाही”; ओबीसी समाज आक्रमक
‘पुरावे नष्ट केल्यावर वाल्मिक कराडने…’; बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतर संभाजीराजेंनी फडणवीस अन् अजितदादांना केलं टार्गेट!
“तर इतके दिवस…”, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया समोर






