मी वाल्मिक कराड, न्यायदेवता देईल ती शिक्षा भोगण्यास तयार; स्वतःच व्हिडीओ शेअर करत पोलिसांना शरण

On: December 31, 2024 12:55 PM
Walmik Karad Video
---Advertisement---

Walmik Karad Video l मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड 22 दिवसांनंतर अखेर पोलिसांसमोर शरण आला आहे. ही घटना पुण्यातील सीआयडी मुख्यालयात घडली. यावेळी वाल्मिक कराडने स्वतःचा व्हिडीओ शेअर करून आपल्या आत्मसमर्पणाची घोषणा केली आहे.

या प्रकरणात काय खुलासे होणार? :

वाल्मिक कराडच्या आत्मसमर्पणामुळे या प्रकरणात एक महत्त्वपूर्ण वळण आले आहे. संतोष देशमुख यांची हत्या ही एक गंभीर घटना होती जिने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवली होती. या प्रकरणाच्या तपासात सीआयडीने मोठी कारवाई केली आहे आणि अनेक आरोपींचा शोध घेतला आहे.

मात्र आता वाल्मिक कराडच्या आत्मसमर्पणानंतर, या प्रकरणातील अनेक नवीन वळणे समोर येण्याची शक्यता आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येमागील मुख्य कारणे आणि आरोपींचे नेटवर्क कसे होते हे समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर, या प्रकरणातील इतर आरोपींवर कोणती कारवाई होणार हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे.

Walmik Karad Video l मुख्य आरोपी सुदर्शन घुले अद्यापही फरार :

वाल्मिक कराडने व्हिडीओ शेअर करत म्हंटल आहे की, “मी वाल्मिक कराड, केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना, सीआयडी ऑफिस, पुणे पाषाण रोड येथे सरेंडर होत आहे. संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी, राजकीय द्वेषापोटी माझं नाव जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष येतील आणि मी त्यात दोषी दिसलो, तर न्यायदेवता जी शिक्षा देईल, ती भोगायला मी तयार आहे,” असं वाल्मिक कराड यांनी म्हटलं आहे.

https://twitter.com/thodkyaat/status/1873989768150958566

मात्र आता वाल्मिक कराडच्या आत्मसमर्पणानंतरही, या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले अद्यापही फरार आहे. सीआयडी आणि पोलिस खात्याकडून त्याचा शोध सुरु आहे. वाल्मिक कराडच्या आत्मसमर्पणाने या प्रकरणाचा एक महत्त्वपूर्ण भाग समोर आला आहे, परंतु संपूर्ण सत्य समोर येण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी अजूनही अनेक गोष्टी बाकी असल्याचं म्हंटल आहे.

News Title : Walmik Karad surrender to police

महत्त्वाच्या बातम्या-

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण

वाल्मिक कराडचा तो व्हिडीओ अखेर समोर, ‘संतोषभय्या देशमुखच्या

‘वाल्मिक कराडची दुसरी बायको…’, संतोष देशमुखांच्या भावाने केला खळबळजनक दावा

पुणेकरांनो 31 डिसेंबरला वाहतुकीत मोठे बदल!

पुणेकरांनो गडकिल्ले, टेकड्यांवर 31st साजरा करताय?; मग ही बातमी वाचाच

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now