वाल्मिक कराडांसोबत असलेल्या व्यक्तीने सांगितला सर्व ठावठिकाणा!

On: December 31, 2024 6:14 PM
Walmik Karad surrender
---Advertisement---

Walmik Karad surrender l बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडबाबत एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हापासून वाल्मीक कराड फरार होता. जवळपास 22 दिवसांनंतर वाल्मिक कराड हा स्वतःहून पोलिसांना शरण गेला आहे. मात्र स्कॉर्पिओ कारमधून वाल्मिक कराड सीआयडीच्या कार्यालयात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत गाडीत दोन व्यक्ती होत्या. यापैकी एका व्यक्तीने वाल्मिक कराड हे सीआयडीच्या कार्यालयात येण्यापूर्वी कुठे होते याची माहिती दिली आहे.

तुम्ही वाल्मिक कराडांसोबत कुठून आलात? :

वाल्मिक कराड यांच्यासोबत गाडीतून उतरलेल्या व्यक्तींना तुम्ही वाल्मिक कराडांसोबत कुठून आलात, कुठे होतात, असे प्रश्न विचारण्यात आले. मात्र यावर संबंधित व्यक्तीने म्हटले की, “आम्ही आता देवावरुन आलो आहोत, म्हणजेच आम्ही अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या मंदिरातून इकडे आलो आहोत.”

दरम्यान, “गेल्या आठ दिवस वाल्मिक कराड कुठे होते, हे आम्हाला माहिती नाही. कारण वाल्मिक कराड मला अक्ककोटच्या मंदिरात भेटले”, असल्याचे या व्यक्तीने सांगितले आहे.

Walmik Karad surrender l चौकशीत कोणती माहिती समोर येणार? :

याशिवाय त्या व्यक्तीसोबत असणारा बीडमधील एक नगरसेवक गेल्या तीन दिवसांपासून वाल्मिक कराड यांच्यासोबत असल्याचं समजत आहे. कारण परवापासून वाल्मिक कराड हे पुण्यातच तळ ठोकून आहेत, असे या नगरसेवकाने सांगितले आहे. तसेच वाल्मिक कराड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे भीती वाटत होती असे या नगरसेवकाने सांगितले आहे.

अशातच सध्या पुण्यातील सीआयडी कार्यालयात वाल्मिक कराड यांची सखोल चौकशी सुरु आहे. कारण सीआयडीचे महासंचालक प्रशांत बोरुडे यांच्याकडून वाल्मिक कराड यांना प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे आता या चौकशीत कोणती माहिती समोर येणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राच्या नजरा लागल्या आहेत.

News Title : Walmik Karad surrender to police

महत्त्वाच्या बातम्या-

‘दाते पंचांग बघून…’; कराडच्या शरणागतीवर अंजली दमानियांना संशय

“राजीनामा काय आता चिखलफेकही सहन केली जाणार नाही”; ओबीसी समाज आक्रमक

‘पुरावे नष्ट केल्यावर वाल्मिक कराडने…’; बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतर संभाजीराजेंनी फडणवीस अन् अजितदादांना केलं टार्गेट!

“तर इतके दिवस…”, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया समोर

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now