वाल्मिक कराडचा ‘तो’ व्हिडीओ समोर, म्हणाला ‘संतोष देशमुखच्या…’

On: December 31, 2024 12:31 PM
---Advertisement---

Walmik Karad | बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सध्या राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेला वाल्मिक कराड हे अखेर 22 दिवसांनंतर पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला आहे.

खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिकी कराड अखेर सीआयडीला शरण आला आहे. पुण्यात त्याने सीआयडी समोर शरणागती पत्करली आहे. आता सीआयडी त्याची कसून चौकशी करणार असून त्याला कोर्टात हजर करणार आहे.

वाल्मिक कराडचा व्हिडीओ समोर

शरणागती पत्करण्यापूर्वी वाल्मिकीने एक व्हिडीओ शेअर करून मोठा दावा केला आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडीसमोर हजर होत आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी, फाशी द्यावी. राजकीय कारणासाठी माझं नाव घेऊ नये. या प्रकरणात मी जर दोषी असेल तर मला शिक्षा द्यावी, असं वाल्मिक कराडने म्हटलं आहे.

सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 22 दिवस उलटले आहेत. या प्रकरणातही वाल्मिकी कराडचं नाव घेतलं जात आहे. त्यानुषंगानेही चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात वाल्मिक कराडविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याला हत्याकांडातील आरोपी करण्यात यावं, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. त्यामुळे सीआयडी वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करणार का? असा सवाल करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

पुणेकरांनो 31 डिसेंबरला वाहतुकीत मोठे बदल!

पुणेकरांनो गडकिल्ले, टेकड्यांवर 31st साजरा करताय?; मग ही बातमी वाचाच

वर्षअखेरीस गुड न्यूज, सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

वाल्मिक कराड कुठे लपून बसलाय?, सर्वात मोठी अपडेट समोर

मुंबईकरांनो थर्टी फर्स्टला दारू आणि पार्ट्या जरा जपून; अन्यथा…

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now