बंदोबस्त कमी, शरण येण्याची शक्यता नाही?… तोच पांढऱ्या स्कॉर्पिओतून कराडची एन्ट्री… नेमकं काय घडलं?

On: December 31, 2024 3:11 PM
Dhananjay Munde, Walmik Karad
---Advertisement---

Walmik Karad | सरपंच संतोष देशमुख हत्येला 22 दिवस उलटून गेले असताना, आरोपींना अजून सुद्धा अटक का होत नाहीये असा प्रश्न उपस्थित होत होता. या हत्ये प्रकरणातील आरोपींना अटक करुन लवकरात लवकर त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी देशमुख कुटुंबीयांची मागणी आहे. दरम्यान, संतोष देशमुख हत्येमधील मास्टरमाईंड वाल्मिक कराड यावर खंडणी प्रकरणात आरोप केले होते. गेल्या काही दिवसांपासून वाल्मिक कराड फरार असल्याचं बोललं जात असताना, आज (31 डिसेंबर) रोजी तो स्वतः पुण्यात सरेंडर झाला आहे.

नक्की काय घडलं?

गेल्या काही दिवसांपासून संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील मास्टरमाईंड असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) फरार होता. राज्याच्या राजकारणात कराडच यामध्ये मुख्य आरोपी असल्याचं बोललं जात होतं. दरम्यान, फरार वाल्मिक कराडला शोधण्यासाठी मागील काही दिवस पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला. मात्र, पोलिसांना कराडच्या आत्मसमर्पणाबाबत कोणतीही अधिकृत माहिती नव्हती. त्यामुळे अधिकारी आणि सुरक्षा बंदोबस्त हळूहळू कमी करण्यात आला.

एवढंच नाही तर, वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या परिसरात निघून गेले. वाल्मिक कराड (Walmik Karad) हे आज शरण येण्याची शक्यता कमी असल्याचं वाटत असतानाच अचानक, कराड पांढऱ्या स्कॉर्पिओतून वेगाने येताना दिसला. गेटवर उपस्थित पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि सीआयडी कार्यालयात नेलं. कराडसोबत बीड येथील दोन नगरसेवक उपस्थित होते.

आठ दिवस तो कुठे होता?

गाडीत मध्यभागी बसून त्यांनी माध्यमांपासून लपण्याचा प्रयत्न केला. गाडीच्या गतीने पोहोचताच पोलिसांनी कराडला ताब्यात घेतले. माध्यमांनी त्याला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, जसे की गेले आठ दिवस तो कुठे होता. मात्र, कराडने उत्तर देण्यास नकार देत हात जोडले. सीआयडीचे चौकशी सत्र सुरू वाल्मिक कराडच्या आत्मसमर्पणानंतर सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक प्रशांत बुरडे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी सत्र सुरू झाले आहे. कराडसोबत उपस्थित नगरसेवकांची चौकशी होणार आहे. संतोष देशमुख हत्येप्रकरणी कराडची भूमिका तपासली जात आहे.

पोलिसांना शरण येण्याआधी वाल्मिक कराडचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडीसमोर हजर होत आहे. संतोष भैया देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी, फाशी द्यावी. राजकीय कारणासाठी माझं नाव घेऊ नये. या प्रकरणात मी जर दोषी असेल तर मला शिक्षा द्यावी, असं वाल्मिक कराडने म्हटलं आहे.

News Title : walmik karad surrender infront of CID

महत्त्वाच्या बातम्या-

सुरेश धस अखेर नरमले, ‘त्या’ वक्तव्याबाबत प्राजक्ता माळीची मागितली माफी

“गुन्हेगार स्वत: सरेंडर होत असेल तर मग पोलीस…”; देशमुखांच्या मुलीचा संतप्त सवाल

मी वाल्मिक कराड, न्यायदेवता देईल ती शिक्षा भोगण्यास तयार; स्वतःच व्हिडीओ शेअर करत पोलिसांना शरण

वाल्मिक कराडचा मोठा गौप्यस्फोट, “म्हणाला फाशीची शिक्षा….”

“राजकीय द्वेषापोटी माझं नाव…”; वाल्मिक कराडचा व्हिडिओ व्हायरल

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now