वाल्मिक कराड हत्येच्या दिवशी आरोपींसोबत 10 मिनिटे बोलला! सगळं सत्य आलं समोर

On: January 15, 2025 4:21 PM
Walmik Karad Custody
---Advertisement---

Walmik Karad Custody l बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचे मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका असलेला संशयित आरोपी वाल्मिक कराडबाबत नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अशातच वाल्मिक कराडवर मकोका आणि संतोष देशमुख हत्येच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवल्यानंतर त्याला बीड कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी एक नवीन खुलासा समोर आला आहे.

वाल्मिक कराड संदर्भात अधिकाऱ्यांनी दिली खळबळजनक माहिती :

आज बीड कोर्टात एसआयटीचे प्रमुख व तपास अधिकारी अनिल गुजर यांनी वाल्मिक कराडचा खून प्रकरणात सहभाग असल्याचा पुरावा न्यायालयाला दिला आहे. कारण ज्या दिवशी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली, अगदी त्याच दिवशी दुपारी देशमुख खून प्रकरणातील आरोपी आणि वाल्मिक कराड यांचे बोलणे झाले असल्याचे कॉल रेकॉर्ड आम्हाला मिळाले असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

याशिवाय देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि वाल्मिक कराड यांच्यात तब्ब्ल 10 मिनिटांचे बोलणे झाला असल्याचा दावा तपास अधिकारी गुजर यांनी न्यायालयात केला आहे. त्यामुळे आता देशमुख खून प्रकरणात वाल्मिक कराड पुरता अडकल्याचे बोलले जात आहे.

Walmik Karad Custody l वाल्मिक कराडला 10 दिवसांची पोलीस कोठडी :

दरम्यान, वाल्मिक कराडच्या खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी आज केज न्यायालयात होणार होती. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव आजची सुनावणी बीड जिल्हा न्यायालयात पार पडली. आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बीड न्यायालयात सुनावणी सुरू झाली होती.

सुनावणी दरम्यान, देशमुख यांची हत्या ज्या दिवशी झाली अगदी त्याची दिवशी दुपारी ३.२० ते ३.३० दरम्यान आरोपी सुदर्शन घुले, विष्णू चाटे यांचे वाल्मिक कराड यांच्याशी फोनवरून बोलणे झाले असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात एसआयटी पथकाने तपासादरम्यान कॉल ट्रेस केले, यावेळी ही माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि वाल्मिक कराड यांच्यात नेमके काय बोलणे झाले याचा तपास करण्याचे तपास अधिकारी अनिल गुजर यांनी कोर्टात सांगितले. मात्र त्या दरम्यान वाल्मिक कराडला बीड न्यायालयाकडून 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

News Title : Walmik Karad Santosh Deshmukh spoke to the accused for 10 minutes on the day of the murder

महत्वाच्या बातम्या-

वाल्मिक कराड मुंडेंकडे घरगडी म्हणून होता, मग एवढी संपत्ती कशी आली?

केज पोलीस ठाण्याबाहेर ब्लॅक गाडीच्या घिरट्या, नेमकं प्रकरण काय?

लाडक्या बहीणींनो ‘या’ दिवशी मिळणार जानेवारीचा हप्ता?, मोठी अपडेट समोर

धनंजय मुंडेंवर अन्याय का? मविआच्या नेत्याचा सवाल

गुड न्यूज! सोने-चांदीत आली स्वताई, ‘इतक्या’ हजारांची झाली घसरण

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now