पत्नी, ड्रायव्हरच्या नावे कोटींचे फ्लॅट; वाल्मिक कराडची प्रॉपर्टी पाहून थक्क व्हाल

On: January 15, 2025 12:20 PM
Walmik Karad Property in real estate
---Advertisement---

Walmik Karad Property | मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड याच्यावर देखील आता मकोका लागला आहे. कराडवर मकोका लागताच त्याच्या संपत्तीबाबतही तपास केला जातोय. त्याची बाहेर ठिकाणी कुठे संपत्ती आहे का?, त्याचा शोध घेतला जातोय. यातच आता पिंपरी चिंचवडमधील अतिशय उच्चभ्रू सोसायटीत वाल्मिक कराडचा (Walmik Karad Property) फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे.

वाल्मिक कराडने पिंपरी चिंचवडमधील अतिशय उच्चभ्रू सोसायटीत फ्लॅट खरेदी केल्याचं समोर आलंय.वाल्मिक बाबुराव कराड आणि पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या नावाने हा फ्लॅट आहे. काळेवाडी फाट्याजवळच्या पार्क स्ट्रीट सोसायटीतील पार्क आयवरी इमारतीत हा 4BHK फ्लॅट आहे.

पुण्यात 4BHK फ्लॅट, 6 ऑफिस

या हायफाय फ्लॅटची किंमत तब्बल 3 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. कराडने मुंबई-पुणे यासारख्या मोठ्या शहरात मोठी गुंतवणूक केली असल्याची माहिती आहे. पुण्यातील पार्क स्ट्रीट सोसायटीत 601 नंबरचा फ्लॅट वाल्मिक कराडचा (Walmik Karad Property) असल्याची माहिती आहे. या फ्लॅटवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कारवाई करत कर थकल्याने नोटीस लावली आहे.

वाल्मिक कराड याने पत्नीच्या नावे आणि ड्रायव्हरच्या नावे अनेक ठिकाणी संपत्ती घेतल्याची माहिती आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या इमारतीत देखील वाल्मिक कराडने 25 कोटी रुपये खर्चून सहा ऑफिस स्पेसेस विकत घेतल्याची  माहिती आहे.

1500 कोटींची संपत्ती जमवल्याचा दावा

भाजपा आमदार सुरेश धस यांनी देखील मागे कराडच्या (Walmik Karad Property) संपत्तीबाबत धक्कादायक दावा केला होता. सुरेश धस यांनी वाल्मिक कराडने तब्बल 1500 कोटींची संपत्ती जमवल्याचा आरोप केला होता. बीडमध्ये वाल्मिक कराडने बेकायदेशीर उद्योगांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दहशत पसरवली. तसेच त्याने बेकायदेशीर उद्योगांच्या माध्यमातून प्रचंड पैसा गोळा केल्याचं देखील मागे समोर आलं होतं.

News Title : Walmik Karad Property in real estate

महत्वाच्या बातम्या –

पुण्यातील वाहतुकीमध्ये मोठा बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

मकोका लागताच वाल्मिक कराडचा आणखी एक धक्कादायक मॅटर समोर!

अजित दादांचा धनंजय मुंडेंना मोठा धक्का?, बीडमध्ये मोठ्या घडामोडी

वाल्मिक कराडवर मकोका लागताच परळीत तणावपूर्ण शांतता, आता पुढील कारवाई काय?

पंतप्रधान मोदी आज मुंबईत, ‘असा’ असणार संपूर्ण दौरा!

Join WhatsApp Group

Join Now