पुण्यातील मगरपट्टा ते एफसी रोड, आकाची संपत्ती किती?

On: January 9, 2025 4:00 PM
Walmik Karad Property
---Advertisement---

Walmik Karad Property l बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन एक महिना उलटला आहे. मात्र तरी देखील या घटनेनं राज्यभरात अद्यापही खळबळ उडत आहे. कारण देशमुख हत्या प्रकरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या राजकारणावर देखील उमटत आहेत. कारण या प्रकरणावरून मोठ्या प्रमाणात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं दिसत आहे. अशातच आज भाजप आमदार सुरेश धस यांनी आकाच्या संपत्ती संदर्भात एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

सुरेश धस नेमकं काय म्हणाले? :

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. दरम्यान संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, तसेच सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी राज्यातील विविध भागात आक्रोश मोर्चे काढले जात आहेत. अशातच आज पैठणमध्ये देखील सरपंच हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मात्र या मोर्चामध्ये बोलताना आमदार सुरेश धस यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

यावेळी सुरेश धस म्हणाले, “आकांनी भरपूर माल जमावला आहे, त्यामुळे आका आता अंबानींना मागे टाकतात की काय अशी शंका मला वाटत आहे. तसेच आकांकडे काम करणाऱ्या अनेक लोकांच्या नावावर जमिनी आहेत. तसेच पुण्यातील मगरपट्ट्यात देखील आकांनी एक अख्खा फ्लोअर विकत घेतला आहे. ज्याची किंमत सध्या मार्केटमध्ये तब्बल 75 कोटी रुपये इतकी आहे, तसेच हा फ्लोअर आकाच्या चालकाच्या नावावर असल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी केला आहे”.

Walmik Karad Property l “आका शंभर टक्के 302 चा आरोपी” : आ. सुरेश धस

पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले की, मी यासंदर्भातील सर्व माहिती बिल्डरकडून मिळवली आहे. त्यामुळे पुण्याच्या एफसीरोडवर देखील आकाने सात दुकानं बुक केली आहेत, तसेच त्या एका दुकानाची किंमत तब्बल पाच कोटी रुपये आहे”, असं धस म्हणाले.

दरम्यान “आका शंभर टक्के 302 चा आरोपी आहे, त्यामुळे परळीत एका वर्षात तब्बल 109 मृतदेह सापडले आहेत, मात्र त्यातील अनेक मृतदेहाची ओळख देखील पटलेली नाहीये, त्यामुळे आकाने मोठ्या आकाला जर फोन केला असेल तर त्याचा देखील नंबर येईल असं सुद्धा आमदार सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

News Title : Walmik Karad Property In Pune

महत्वाच्या बातम्या –

वाल्मिक कराडवर ED ची कारवाई का होत नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची अनोखी प्रेमकहाणी, बायको जापनीज कशी काय?

संतोष देशमुख हत्येप्रकरणी सरपंच परिषद आक्रमक; केल्या ‘या’ मागण्या

शेतकऱ्यांनी आता शेती करणं सोडून द्यायचं का?, खतांच्या किंमती पुन्हा वाढल्या

HMPV व्हायरस संदर्भात समस्या असल्यास ‘या’ टोल फ्री नंबरवर संपर्क करा!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now