वाल्मिक कराडबद्दल आणखी एक धक्कादायक माहिती उघड, लाडकी बहीण योजनेच्या…

On: January 9, 2025 8:37 AM
Walmik Karad President of Ladki Bahin Yojana Committee
---Advertisement---

Walmik Karad | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या समिती अध्यक्षपदी 14 गुन्हे दाखल असलेला वाल्मिक कराड अजूनही कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, ही नियुक्ती तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीवरून झाली होती. (Walmik Karad)

कराडवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असतानाही त्याला लाडकी बहीण योजनेच्या समितीमध्ये स्थान कसे मिळाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या वृत्तामुळे राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे अगोदरच या प्रकरणामुळे टार्गेट होत आहेत. अशात या नवीन खुलाशामुळे मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

कराडवर कोणते आरोप आहेत?

केज तालुक्यातील मस्साजोग येथे पवनचक्कीचे काम करणाऱ्या आवादा कंपनीच्या एका अधिकाऱ्याला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात वाल्मिक कराडसह विष्णू चाटे, सुदर्शन घुले या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

या प्रकरणाचा तपास सीआयडी पथक करीत आहे. कराड (Walmik Karad) हा पुण्यात शरण आला होता, तर चाटे याला बीड शहराजवळून अटक करण्यात आली होती. सध्या दोघेही पोलिस कोठडीत आहेत.

अधिकाऱ्यांनी फोन उचलला नाही

याबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आणि परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही, अशी माहिती काही मीडिया रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.  (Walmik Karad)

News Title : Walmik Karad President of Ladki Bahin Yojana Committee

महत्त्वाच्या बातम्या-

शेतकऱ्यांसाठीची महत्त्वाची योजना रखडली; या कारणामुळे योजनेचं भविष्य अधांतरी

आजचे राशिभविष्य! तुमच्या जीवनाचा मार्गदर्शक संदेश, नक्की वाचा

मनसे आणि भाजपची युती होणार? ‘या’ बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य

“… तर सुरेश धस यांना बंदुकी दिसल्या नाहीत का?”; ‘या’ नेत्याचा मोठा दावा

आताची सर्वात मोठी अपडेट!, वाल्मिक कराडविरोधात पोलिसांना सर्वात मोठा पुरावा मिळणार?

Join WhatsApp Group

Join Now