वाल्मिक कराडचा मोठा गौप्यस्फोट, “म्हणाला फाशीची शिक्षा….”

On: December 31, 2024 12:42 PM
walmik karad
---Advertisement---

Walmik Karad | बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. कारण या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिकी कराड अखेर सीआयडीला शरण आला आहे. पुण्यात त्याने सीआयडी समोर शरणागती पत्करली आहे.

सीआयडी चौकशी करणार-

वाल्मिकी कराडची (Walmik Karad) सीआयडी कसून चौकशी करणार असून त्याला कोर्टात हजर करणार आहे. शरणागती पत्करण्यापूर्वी वाल्मिकीने एक व्हिडीओ शेअर करून मोठा दावा केला आहे. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 22 दिवस उलटले आहेत. या प्रकरणातही वाल्मिकी कराडचं नाव घेतलं जात आहे. त्याअनुषंगानेही चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडीसमोर हजर होत आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी, फाशी द्यावी. राजकीय कारणासाठी माझं नाव घेऊ नये. या प्रकरणात मी जर दोषी असेल तर मला शिक्षा द्यावी, असं वाल्मिक कराडने म्हटलं आहे.

चार आरोपींना अटक-

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे अशी या आरोपींची नावे आहेत. तर, मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे फरार आहेत.

या वेळी संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुखने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे, ‘वाल्मिक कराड (Walmik Karad) स्वतः पोलिसांना शरण गेले तर मग इतक्या दिवस पोलीस काय करत होते?’, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केलाय. सध्या वाल्मिक कराड यांच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल असून त्यांच्या अटकेनंतर आता पुढील तपास लवकरच केला जाईल.

News Title : walmik karad on santosh deshmukh murder case

महत्त्वाच्या बातम्या-

‘वाल्मिक कराडची दुसरी बायको…’, संतोष देशमुखांच्या भावाने केला खळबळजनक दावा

पुणेकरांनो 31 डिसेंबरला वाहतुकीत मोठे बदल!

पुणेकरांनो गडकिल्ले, टेकड्यांवर 31st साजरा करताय?; मग ही बातमी वाचाच

वर्षअखेरीस गुड न्यूज, सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

वाल्मिक कराड कुठे लपून बसलाय?, सर्वात मोठी अपडेट समोर

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now