‘माझ्या लेकानं काही केलं नाही, तो निर्दोष…’; वाल्मिक कराडच्या आईचं परळीत आंदोलन

On: January 14, 2025 12:41 PM
Walmik Karad
---Advertisement---

Walmik Karad | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज मोठे खुलासे होत आहेत. या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. कालच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं. तर, आज परळीत आणखी एक आंदोलन केलं जातंय. आवादा कंपनीला 2 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात आहे. (Walmik Karad)

अशात आज (14 जानेवारी) खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडची आई पारुबाई कराड या परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलनाला बसल्या आहेत. आपल्या मुलाला सोडावं. तो निर्दोष आहे असं पारुबाई कराड यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या आंदोलनाने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे.

वाल्मिक कराडच्या आईचं आंदोलन

‘माझ्या मुलाला न्याया द्या’ असं म्हणत पारुबाई कराड या परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलनाला बसल्या आहेत. माझ्या लेकानं काहीही केलं नाही. माझ्या लेकासाठी मी जीव द्यायला तयार आहे. इथून उठणार नाही, असं पारुबाई कराड म्हणाल्या आहेत. (Walmik Karad)

यावेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांना वाल्मिक कराडला 2 कोटींच्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे, असा सवाल केला त्यावर पारुबाई कराड यांनी हे सर्व खोटं असल्याचं म्हटलं. “माझ्या लेकाला निर्दोष सोडत नाही, तोपर्यंत हलणार नाही. माझ्या लेकाला सोडा, त्याने काही केलं नाही” असं वाल्मिक कराडच्या आईचं म्हणणं आहे.

बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश

दरम्यान, आजपासून 28 जानेवारीपर्यंत बीड जिल्ह्यात जमावबबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. 2 कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावण्यात आलेला नाही. वाल्मिक कराडलाही मोक्का लावून त्याच्यावर 302 कलमातंर्गत कारवाई करा,अशी मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक आणि देशमुख कुटुंबीयांनी आंदोलन सुरू केलं आहे.

येत्या काही दिवसांमध्ये या आंदोलनाची धग वाढण्याची शक्यता असल्याने बीडमध्ये प्रशासनाने मोठा निर्णय घेतलाय. बीड जिल्ह्यात 14 जानेवारीपासून 28 जानेवारीपर्यंत जमावबंदी राहणार आहे. आज मध्यरात्रीपासून 28 तारखेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. यानुसार, सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना मोर्चे , निदर्शने , आंदोलने करण्यासास परवानगी नसणार आहे. बीडचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी हे आदेश पारित केले आहेत. (Walmik Karad)

News Title : Walmik Karad Mother protest in parli

महत्वाच्या बातम्या-

वाल्मिक कराडविरोधात सीआयडीचं सर्वात मोठं पाऊल!

मकर संक्रांतीला काळ्या तिळाचे लाडू का खातात?, काय आहे त्यामागील कारण?

शरद पवार गटाचे नेते महेश कोठे यांचं निधन!

आज मकर संक्रांती, आपल्या प्रियजणांना द्या ‘या’ हटके शुभेच्छा!

आज मकर संक्रांतीला ‘या’ 3 राशींना येणार सोन्याचे दिवस!

Join WhatsApp Group

Join Now