Walmik Karad | महाराष्ट्रात खळबळ उडवून टाकणाऱ्या सरपंच हत्या प्रकरणी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा आज 31 डिसेंबररोजी स्वतःहून पोलिसांना शरण गेला आहे. त्याला नुकतीच अटक करण्यात आली आहे. (Walmik Karad)
वाल्मिक कराड हा आता पुणे पोलिसांना आणि सीआयडीला शरण आला आहे. नुकतंच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शरण येण्यापूर्वी त्याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. यात वाल्मिक कराडने मोठा दावा केलाय.त्याने स्वतःवर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.
वाल्मिक कराड सरेंडर
शरणागती पत्करण्यापूर्वी वाल्मिकने एक व्हिडीओ शेअर करून आपला संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा केला आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडीसमोर हजर होत आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी, फाशी द्यावी. आपल्याला राजकीय द्वेषापोटी गोवण्यात आल्याचा आरोप वाल्मिक कराडने केलाय.
इतकंच नाही तर, संतोष देशमुख हत्या प्रकरणी माझा काही संबंध नाही. या प्रकरणात मी जर दोषी असेल तर मला शिक्षा द्यावी, असंही वाल्मिक कराडने म्हटलंय. त्याचा हा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल झालाय. दरम्यान, वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचं सांगितलं जात आहे. (Walmik Karad)
या प्रकरणात वाल्मिक कराडविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याला हत्याकांडातील आरोपी करण्यात यावं, अशी मागणी सातत्याने केली जातेय. सध्या वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचे आरोप आहेत. त्याच्यावर इतरही गंभीर आरोप आहेत. पण खंडणी प्रकरणात त्याला आता सीआयडीने ताब्यात घेतलंय.
News Title : Walmik Karad denied the allegations
महत्त्वाच्या बातम्या-
आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण
वाल्मिक कराडचा तो व्हिडीओ अखेर समोर, ‘संतोषभय्या देशमुखच्या
‘वाल्मिक कराडची दुसरी बायको…’, संतोष देशमुखांच्या भावाने केला खळबळजनक दावा
पुणेकरांनो 31 डिसेंबरला वाहतुकीत मोठे बदल!
पुणेकरांनो गडकिल्ले, टेकड्यांवर 31st साजरा करताय?; मग ही बातमी वाचाच






