कृषीमंत्री जवळचे सांगत शेतकऱ्यांची फसवणूक, वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा उघड

On: January 12, 2025 12:31 PM
Walmik Karad cheated farmers of 11 crores
---Advertisement---

Walmik Karad | बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे वाल्मिक कराड हाच मास्टरमाईंड असल्याचा सातत्याने आरोप होत आहे. सध्या कराड हा तुरुंगात आहे. वाल्मिक कराड हा अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचा असल्याने ते देखील अडचणीत सापडले आहेत. कराड (Walmik Karad) आवादा कंपनीला 2 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी सध्या तुरुंगात आहे. त्याचा संबंध संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी देखील जोडला जातोय. सीआयडीकडून या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे.

सरपंच हत्या कांडबाबत भाजपा आमदार सुरेश धस रोज खळबळजनक खुलासे करत आहेत. वाल्मिक कराड हा सराईत गुन्हेगार असून त्याने यापूर्वी देखील अनेक गंभीर गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. अशात कराडचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. वाल्मिक कराडने ऊसतोड शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहे.

वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा उघड

सोलापूरमध्ये कराडने 140 शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. ऊस तोडणी यंत्राचे 36 लाख रूपये शासकीय अनुदान मिळवून देतो असं सांगत वाल्मिक कराडने प्रत्येक ऊस तोडणी यंत्र मालकाला आठ लाख रूपयांचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूरसह राज्यातील 140 ऊस तोडणी यंत्र मालकांना 11 कोटी 20 लाख रूपयांनी कराडने गंडवले असल्याचं समोर आलंय.

ऊस तोडणी यंत्र मालक दिलीप नागणे यांनी हा गंभीर आरोप केलाय. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सह्याद्री अतिथी गृहावर स्वतः मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना भेटल्यानंतर 8 लाख रुपये दिल्याचा आरोप त्यांनी केलाय. या शेतकऱ्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतल्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे. यामध्ये कराड (Walmik Karad) देखील दिसून येतोय.

‘तो’ व्हिडिओ व्हायरल

वाल्मिक कराडने (Walmik Karad) कृषीमंत्री जवळचे आहेत म्हणून अनुदान मिळवून देतो, असं आमिष दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्यातच शेतकऱ्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाल्याने कराड हा आणखी अडचणीत सापडू शकतो.

News Title :  Walmik Karad cheated farmers of 11 crores

महत्त्वाच्या बातम्या-

परळीत आणखी एका सरपंचचा मृत्यू, सर्वत्र एकच खळबळ

‘त्या’ फोनबाबत विष्णु चाटे तोंड उघडेना; CID कडून अजूनही तपास सुरूच

ग्राहकांना झटका! सोनं पुन्हा 80 हजारांवर?, जाणून घ्या आजचे दर

हार्ट अटॅक नव्हे तर…टिकू तलसानिया यांना झालंय तरी काय?; प्रकृती अत्यंत नाजुक

दिवसाची सुरुवात आनंदवार्ताने, पेट्रोल-डिझेलचे दर ‘इतक्या’ रुपयांनी घसरले?

Join WhatsApp Group

Join Now